*उच्चदाब वीजवाहिन्या बदलण्याचे काम*

लातूर : शहराच्या उत्तर भागातील उच्चदाब वीजवाहिन्या बदलण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे. त्याकरिता दि.१ फेब्रुवारी ते दि.०३ फेब्रुवारी या दरम्यान दररोज एका वीजवाहिनीवरील परिसराचा वीजपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. वीजग्राहकांनी सदरील दिनांकाची व वेळेची दखल घ्यावी असे महावितरणने कळवले आहे.
शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी रोजी ११ केव्ही
शारदा नगर व मेडीकल वीजवाहिनीवरील बनसोडे नगर, काशिलीन्गेश्वर नगर, देवगिरी नगर, भक्ती नगर, तिरुपती नगर, बेम्बलकर नगर, होळकर नगर, पठाण नगर, नंदधाम सोसायटी, आर्वी गाव, साई रोड सर्व भाग, चांदतारा मज्जीद सर्व भाग, डॉक्टर कॉलनी भिसेन नगर, रामचंद्र नगर, व्यंकटेश नगर, अजिंक्य सिटी, मा-बाप कॉलनी, मयुरबन सोसायटी, मधुबन मैत्री पार्क, प्रयागबाई कॉलेज भाग, बालाजी मंदिर भाग, जुना रेणापूर नाका, खोरे गल्ली, नगरपालिका भाग, तहसील, कोर्ट भाग, एसटी वर्कशॉप परिसराचा वीजपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत बंद राहील.
रविवार दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी ११ केव्ही द्वारका वीजवाहिनीवरील शारदा नगर, रेणुका नगर, व्यंकटेश नगर, गोरक्षण, मणियार नगर, टाके नगर, कल्पना नगर, कैलास नगर, जटाळ हॉस्पिटल भाग, श्रमसाफल्य सोसायटी, एसपी ऑफिस, मथुरा सोसायटी, संजय क्वालिटी भाग, केशवराज शाळा भाग, नवीन रेणापूर नाका ते शिवाजी चौक जाताना उजव्या हाताच्या परिसराचा वीजपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत बंद राहील.
सोमवार दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी ११ केव्ही साळे गल्ली वीजवाहिनीवरील बौद्ध नगर, ताजोद्दिन बाबा नगर, म्हेसुर कॉलनी, सिद्धार्थ सोसायटी, सल्लाउद्दीन कॉलनी, ६० फुटी रोड परिसराचा वीजपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत बंद राहील.
वीजपुरवठा बंद राहणाऱ्या परिसरातील वीजग्राहकांना एसएमएस द्वारे वीजबंद राहणार असल्याबाबत कळवण्यात आले आहे. वीजग्राहकांनी सदरील वेळेची दखल घेत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

