• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

उजळंब येथे आढळला चालुक्य कालीन ९१६ वर्ष जुना शिलालेख

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
March 17, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चाकुर तालुक्यातील उजळंब या गावी नागेश्वर(नागोबा) मंदिर समोर एक कन्नड शिलालेख आढळून आला आहे. तो मंदिर समोर उभा करून ठेवलेला आहे. त्याचे वाचन प्रथमच उपलब्ध झाले आहे व त्यातून नवीन इतिहास उजेडात आला आहे. या शिलालेखाचे वाचन देवरकोंडा रेड्डी यांनी केले आहे तर स्थानिक संशोधन कृष्णा गुडदे यांनी केले आहे.
या २३ ओळींच्या हळे कन्नड शिलालेखात वरील बाजूस सूर्य, चंद्र व शिवपिंड कोरली आहे. त्याखाली 23 ओळींचा कन्नड शिलालेख करण्यात आलेला आहे व सर्वांत खाली गाय- वासरू व तलवार कोरण्यात आलेली आहे. शिलालेखाच्या सुरुवातीला भगवान शिवा स्तुती करण्यात आली आहे. त्यानंतर चालुक्य राजा त्रिभुवनमल्ल देव अर्थात विक्रमादित्य सहावा याचा राजप्रशस्तीसह उल्लेख आलेला आहे. हा राजा सत्तेवर असताना या राजाच्या ३४ व्या राज्य वर्षी, विरोधी संवत्सर असताना वैशाख मासातील अमावस्या रविवार दिवशी सूर्यग्रहण असताना या शिलालेखामध्ये दान दिल्याचे नमूद करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष पाहताना त्यादिवशी सूर्यग्रहण नव्हते. तिथीचा विचार करता पिल्ले जंत्रीनुसार त्यावेळी इंग्रजी तारीख १ मे ११०९ शनिवार अशी येते.
यावेळी विक्रमादित्य सहावा हा जयंतीपूर अर्थात बनवासी येथून राज्य करत असल्याचे सांगितले आहे. या राजाचा मांडलिक राजा उजळंब येथून राज्य करत होता. मांडलिक राजाच्या नावापुढे पंचमहाशब्द, महामंडलेश्वर, उज्जनज्यापूरवराधिश्वर (उज्जल अर्थात उजळंब येथून राज्य करणारा), सिंधमार्तंड(सिंध कुळातील), वैरीकुलकाळदंड(शत्रूवर काळाचा दंड पडल्या प्रमाणे), कळीय सेळेवम, आळी मुंनिळेवं(पहिल्या फळीत लढणारा), बंटरभाव(पराक्रमी वीरांना जवळचा), सौर्यमं मेणेवं स्वगुन(शत्रू समोर लढून विरत्व दाखवण्याचा गुण असलेला), वैरी वृकोधर(शत्रूला भीमाप्रमाणे, तैलनसिंग(राजाच्या समोर राहून रक्षक करणारा), सहसोत्तुंग, नागेश्वरदेव वरलब्ध प्रसाद लाभलेला असा मांडलिक राजा याने(याठिकाणी शिलालेख खराब झाल्याने मांडलिक राजाचे नाव कळू शकले नाही) नागेश्वर देवाच्या पूजा पुनस्कार साठी १०० मत्तर जमीन दान दिली. तसेच श्रीमद् धवल दंडनायक याचा मुलगा(?) श्रीधर साहनी याने नागेश्वर देवाच्या नैवेद्य, अखंड नंदादीप, धूप यासाठी ६०० मत्तर जमीन तसेच एक घर सर्व बाधा परिहार करून दान दिले. यापुढे वेगवेगळे अनेक शापवचने शिलालेखात आली आहेत. याचा उद्देश हे ठरवून दिलेले धर्मदान सर्वांनी पाळावे असा आहे.
एक मत्तर बरोबर साधारण पणे ३ एकर होते. मात्र राजवट व देश यावरून याचे एकक कमी जास्त होते. उजळंब येथील मांडलिक राजा पराक्रमी, लढाऊ, सिंध कुळातील, राजाचा रक्षक, नागेश्वर देवाचा भक्त असल्याचे यातून समजते. तसेच आज जरी तत्कालीन जुने मंदिर उभे नसले तरी आहे या संशोधनातून त्या मंदिराचा, गावचा इतिहास जवळपास ९१६ वर्ष मागे जातो यातून तत्कालीन राजवट, राजा, मांडलिक, देवता, दान पद्धती, दानाचे रक्षण व्हावे म्हणून वापरले जाणारे शाप वचने इत्यादी ऐतिहासिक माहिती या उजळंब शिलालेखातून उपलब्ध झाली आहे.

Previous Post

पद्मभूषण डॉ. अशोक (काका) कुकडे : मराठवाड्याच्या सेवाभावाचा दीपस्तंभ

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

उजळंब येथे आढळला चालुक्य कालीन ९१६ वर्ष जुना शिलालेख

March 17, 2026

पद्मभूषण डॉ. अशोक (काका) कुकडे : मराठवाड्याच्या सेवाभावाचा दीपस्तंभ

March 17, 2026

लातूर शहर महानगरपालिकेत नियमांना हरताळ?कनिष्ठ अभियंत्याकडे कार्यकारी अभियंत्याचा कारभार; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह…

March 17, 2026

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

March 16, 2026

Recent News

उजळंब येथे आढळला चालुक्य कालीन ९१६ वर्ष जुना शिलालेख

March 17, 2026

पद्मभूषण डॉ. अशोक (काका) कुकडे : मराठवाड्याच्या सेवाभावाचा दीपस्तंभ

March 17, 2026

लातूर शहर महानगरपालिकेत नियमांना हरताळ?कनिष्ठ अभियंत्याकडे कार्यकारी अभियंत्याचा कारभार; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह…

March 17, 2026

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

March 16, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

उजळंब येथे आढळला चालुक्य कालीन ९१६ वर्ष जुना शिलालेख

March 17, 2026

पद्मभूषण डॉ. अशोक (काका) कुकडे : मराठवाड्याच्या सेवाभावाचा दीपस्तंभ

March 17, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved