• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
March 21, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोद्दार हॉस्पिटलच्या मोफत अस्थिरोग
शिबिरात ७८ रुग्णांची तपासणी – उपचार
लातूर : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त येथील ख्यातनाम अस्थिशल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार यांच्या पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग शिबिरात ७८ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे १६९ वे मोफत आरोग्य शिबीर होते.
या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी लातूर शहर मनपाचे विद्यमान उपमहापौर एड. स्नेहल उटगे, माजी उपमहापौर कैलास कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी

लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ . अभय कदम, डॉ. संजय शिवपूजे , डॉ. शशी पाटील, डॉ. मंगेश कुलकर्णी, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. पल्लवी जाधव, प्रसाद उदगीरकर, जयेश बजाज, श्याम धूत, रामेश्वर सोमाणी, विजय पस्तापुरे , बालाप्रसाद सारडा, विजय रांदड आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने शिबिराचे उदघाटन करण्यात आले. पोद्दार हॉस्पिटलच्या प्रमुख पाहुण्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना एड. स्नेहल उटगे यांनी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त प्रतिवर्षी अशा प्रकारच्या मोफत शिबिराचे आयोजन केले जाते, ही बाब अतिशय महत्वाची आहे. समाजातील सर्वच स्तरातील रुग्णांना या शिबिराचा चांगलाच फायदा होतो. आ. अमित देशमुख यांचे नेतृत्व सर्वव्यापी असल्याने त्यांच्याप्रती अशा पद्धतीने स्नेह व्यक्त करणारी मंडळीही मोठ्या संख्येने लातुरात आहे, ही बाब खरोखर गौरवास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


माजी उपमहापौर कैलास कांबळे यांनी आपल्या मनोगतात डॉ. अशोक पोद्दार प्रतिवर्षी आ. अमित देशमुख यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मोफत शिबिराचे आयोजन करतात, ही बाब आता लातूरच्या सामान्य रुग्णांनाही माहिती झाली आहे. त्यामुळे अनेक रुग्ण या शिबिराची आतुरतेने प्रतीक्षा करताना दिसतात. लातुरात वैद्यकीय क्षेत्रात मोफत आरोग्य शिबिराचा पॅटर्न आणण्याचे काम डॉ. अशोक पोद्दार यांनी केले असून वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबरोबरच ते सामाजिक कार्यातही अग्रेसर असल्याची भावना कांबळे यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद उदगीरकर यांनी आपल्या मनोगतात डॉ. पोद्दार यांच्या आरोग्यविषयक कार्याचा गौरव करून समाजसेवेच्या ध्यासाने झपाटलेले वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य चेहरा म्हणजे डॉ. अशोक पोद्दार असल्याचे सांगितले. जयेश बजाज यांनी यावेळी बोलताना डॉ. अशोक पोद्दार यांना अशा प्रकारच्या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा जणू छंदच जडला असल्याचे बोलून दाखवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक पोद्दार यांनी केले. प्रास्ताविकापूर्वी त्यांनी आ. अमित देशमुख यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने आपल्या हॉस्पिटलच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. ज्या समाजाने आपल्याला एवढे काही भरभरून दिले आहे, त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेने आपण मोफत आरोग्य शिबीराच्या आयोजनास प्राधान्य देत असल्याचे सांगितले. आ. अमित देशमुख यांच्या जन्मदिवसानिमित्त २००९ पासून सातत्याने असे मोफत शिबीर आयोजित केले जाते. आज वैद्यकीय सेवा सुविधा खूप महागल्या आहेत. सामान्य रुग्णांना चांगल्यात चांगल्या सेवा सुविधा मोफत तसेच माफक शुल्कात उपलब्ध करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. समाजाच्या सर्वच स्तरातील रुग्ण त्याचा पुरेपूर लाभ घेतात, हेच या शिबिराचे सर्वात मोठे यश असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. १९९९ पासून हॉस्पिटलच्या आईने उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या थंड पाण्याची सोय करण्यासाठी पाणपोई चालवली जाते. या पाणपोईत थंड पाण्याचे जार उपलब्ध करून दिले जातात. दिवसभरात हजारो नागरिक या पाणपोईचा लाभ घेतात असेही त्यांनी सांगितले. डॉ. अशोक पोद्दार महाराष्ट्र अस्थिरोग तज्ज्ञ संघटनेचे पदाधिकारी असून लातूर जिल्हा अस्थिरोग तज्ज्ञ संघटना, आयएमएम महाराष्ट्र, आयएमए लातूर, आशादीप , दिशा फाउंडेशन , रोटरी परिवार अशा विविध संघटनांच्या माध्यमातून कायम रुग्णसेवा आणि समाज कार्यात अग्रेसर असतात.

आजच्या शिबिरात एकूण ७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २७ रुग्णांचे एक्सरे ५० टक्के सवलतीच्या दरात काढण्यात आले. रक्त व लघवी तपासणीही ५० टक्के सवलतीच्या दरात करण्यात आली. सर्वच्या सर्व ७८ रुग्णांची हाडांच्या ठिसूळतेची मोफत तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना मोफत फिजिओथेरपीची सुविधा ही देण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी हॉस्पिटलचे व्यवस्थापक वसीम शेख यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शिबिरातील रुग्णांना मोफत औषधीही उपलब्ध करून देण्यात आली.

Previous Post

माधवराव पाटील टाकळीकर यांचा बोगस कारभार ? देशिकेंद्र विद्यालयाची इमारत पाडकाम प्रकरण ऐरणीवर

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित

March 21, 2026

माधवराव पाटील टाकळीकर यांचा बोगस कारभार ? देशिकेंद्र विद्यालयाची इमारत पाडकाम प्रकरण ऐरणीवर

March 21, 2026

🚨 लातूरात देशिकेद्र विद्यालयात ‘बोगस भरती’चा बाजार? – नाशिकप्रमाणे कारवाई कधी? 🚨

March 20, 2026

एस.पी.साहेबांना “तक्रार केली तर ठार मारू” — लातूर जिल्ह्यात पोलिसांकडूनच अत्याचार? पीडिताचा थरारक आरोप

March 19, 2026

Recent News

माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित

March 21, 2026

माधवराव पाटील टाकळीकर यांचा बोगस कारभार ? देशिकेंद्र विद्यालयाची इमारत पाडकाम प्रकरण ऐरणीवर

March 21, 2026

🚨 लातूरात देशिकेद्र विद्यालयात ‘बोगस भरती’चा बाजार? – नाशिकप्रमाणे कारवाई कधी? 🚨

March 20, 2026

एस.पी.साहेबांना “तक्रार केली तर ठार मारू” — लातूर जिल्ह्यात पोलिसांकडूनच अत्याचार? पीडिताचा थरारक आरोप

March 19, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित

March 21, 2026

माधवराव पाटील टाकळीकर यांचा बोगस कारभार ? देशिकेंद्र विद्यालयाची इमारत पाडकाम प्रकरण ऐरणीवर

March 21, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved