• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

महापुरुषांचे विचार आचरणात आणत लक्ष्य निर्धारित करून काम करा — अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
September 17, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महावितरण मध्ये विविध उपक्रमाने अभियंता दिन उत्साहात साजरा

Oplus_16908288

लातूर, (प्रतिनिधी): अभियंता दिनानिमित्त महावितरणच्या वतीने लातूर परिमंडळातील विविध कार्यालये तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये ऊर्जा बचत, हरित ऊर्जा, वीज सुरक्षा आणि अभियंत्यांच्या सामाजिक योगदानाबाबत जनजागृतीपर विविध उपक्रम घेऊन अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

अभियंता दिनानिमित्त हॉटेल अनिलच्या सभागृहात (दि.१५) प्रभारी कार्यकारी अभियंता शैलेश पाटील (विभागीय कार्यालय, लातूर), महेंद्र चुनारकर (उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, परिमंडळ कार्यालय, लातूर), सतीश कुलकर्णी (कार्यकारी अभियंता, चाचणी विभाग, लातूर), अशोक पेरकर (व्यवस्थापक, मानव संसाधन), बालाजी शिवलकर (अतिरिक्त कार्यकारी अभियंता, विभागीय कार्यालय, निलंगा) तसेच सुहास मिसाळ (उपकार्यकारी अभियंता, मंडळ, लातूर) यांच्या प्रमूख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात बोलताना अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी यांनी अभियंत्यांना महापुरुषांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता ते आचरणात आणण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “कामात निरंतरता असली पाहिजे. कोणत्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे, हे आपल्याला ठरविता आले पाहिजे. मोठ्या व्यक्तींची केवळ पूजा करून भागणार नाही, तर त्यांच्या कार्यातील गुण आत्मसात करून आपल्या कामात त्यांचा उपयोग केला पाहिजे. स्पष्ट लक्ष्य निर्धारित करून त्याच्या दिशेने सातत्याने काम करणे आवश्यक आहे असे सांगत विजेची गरज लक्षात घेता ग्राहकाभिमूख सेवा प्रदान करण्याचे आवाहन श्री दाणी यांनी अध्यक्षीय समारोप करताना केले.

१५ सप्टेंबर हा भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून पायाभूत सुविधा, उद्योग, ऊर्जा, तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन, दळणवळण आणि पर्यावरणपूरक विकासामध्ये अभियंते महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. विश्वेश्वरय्या यांनी आपल्या दूरदृष्टी, शिस्त, कार्यनिष्ठा आणि तांत्रिक कौशल्यातून देशाच्या विकासाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आधुनिक अभियंत्यांनी ज्ञान, कौशल्य, नवकल्पना आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधण्याची गरज असल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शैलेश पाटील यांनी यावेळी बोलताना सांगीतले.

शाळा-महाविद्यालयांमध्ये ऊर्जा बचत व हरित ऊर्जेचा संदेश

अभियंता दिनाचे औचित्य साधून महावितरणच्या वतीने विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये ऊर्जा बचत, वीजेचा कार्यक्षम वापर, अक्षय ऊर्जा, सौर ऊर्जा आणि हरित ऊर्जेचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना विजेची बचत करण्याच्या विविध उपाययोजना, अनावश्यक विद्युत उपकरणे बंद ठेवणे, ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर करणे तसेच सौर ऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जास्रोतांचा स्वीकार करण्याबाबत महावितरणच्या अभियंत्यांनी मार्गदर्शन केले.

वीज निर्मितीपासून तिचा कार्यक्षम वापर आणि भविष्यातील शाश्वत ऊर्जा व्यवस्था उभारण्यापर्यंत अभियंत्यांची भूमिका स्पष्ट करत विद्यार्थ्यांना “ऊर्जा बचत हीच ऊर्जा निर्मिती” आणि “हरित ऊर्जा—शाश्वत भविष्यासाठी आवश्यक ऊर्जा” हा संदेश देण्यात आला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच अभियंता क्षेत्राविषयीही सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अभियंता सुहास मिसाळ यांनी केले, तर अभियंता अमरनाथ स्वामी यांनी आभार प्रदर्शन केले.

Previous Post

विनायक सावंत यांना ‘शिवरत्न पुरस्कार २०२६’ने सन्मानित

Next Post

महावितरणच्या कार्यकारी संचालकपदी अंकुर कावळे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा, सुनील काकडे रूजू

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

महावितरणच्या कार्यकारी संचालकपदी अंकुर कावळे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा, सुनील काकडे रूजू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

एमएसआरडीसीच्या विकासकामांवर अनिलकुमार गायकवाड यांची विशेष मुलाखत

September 19, 2026

फक्त मानवता! ‘जयंती २’ : आरक्षणाच्या प्रश्नापलीकडे सामाजिक न्यायाचा आरसा….

September 18, 2026

मसलगा येथे गणेशोत्सवानिमित्त ‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमात विविध योजनांविषयी मार्गदर्शन

September 18, 2026

महावितरणच्या कार्यकारी संचालकपदी अंकुर कावळे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा, सुनील काकडे रूजू

September 18, 2026

Recent News

एमएसआरडीसीच्या विकासकामांवर अनिलकुमार गायकवाड यांची विशेष मुलाखत

September 19, 2026

फक्त मानवता! ‘जयंती २’ : आरक्षणाच्या प्रश्नापलीकडे सामाजिक न्यायाचा आरसा….

September 18, 2026

मसलगा येथे गणेशोत्सवानिमित्त ‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमात विविध योजनांविषयी मार्गदर्शन

September 18, 2026

महावितरणच्या कार्यकारी संचालकपदी अंकुर कावळे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा, सुनील काकडे रूजू

September 18, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

एमएसआरडीसीच्या विकासकामांवर अनिलकुमार गायकवाड यांची विशेष मुलाखत

September 19, 2026

फक्त मानवता! ‘जयंती २’ : आरक्षणाच्या प्रश्नापलीकडे सामाजिक न्यायाचा आरसा….

September 18, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved