• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
June 29, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’कडून ऑगस्टमध्ये गौरव

मुंबई, दि. २९ जून २०२६: महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्या विद्युत क्षेत्रातील गेल्या ३७ वर्षांच्या योगदानाची दखल घेत ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’ (भारत) संस्थेच्या वतीने त्यांना ‘एमिनेंट इंजिनियर’ हा देशपातळीवरील मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अमरावती येथे येत्या २१ व २२ ऑगस्टला आयोजित ‘आयईआय’च्या ४१ व्या राष्ट्रीय विद्युत अभियंता अधिवेशनामध्ये संचालक श्री. राजेंद्र पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या दोन दिवसीय अधिवेशनात ‘विकसित भारताचे ध्येय: एआय आणि हरित तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा क्षेत्राचा कायापालट’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. देशाच्या तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व सर्वात मोठी व्यावसायिक संस्था असलेल्या ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडिया’ची स्थापना १९२० मध्ये झाली आहे. कोलकाता मुख्यालय असलेल्या या संस्थेचे देशभरात १२५ पेक्षा अधिक स्थानिक केंद्र आहेत.

श्री. राजेंद्र पवार यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता ते मुख्य अभियंता पदापर्यंत काम केले आहे. या ३६ वर्षांच्या कालावधीत प्रामुख्याने ग्रामीण भागातील दऱ्याखोऱ्यांसह घरगुती, शेती, व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रात नवीन वीजयंत्रणा उभारणे, नवीन वीजजोडण्या आणि सुरळीत वीजपुरवठ्यासाठी उल्लेखनीय कामे केली आहेत. एप्रिल २०२५ पासून श्री. पवार महावितरणचे संचालक (मानव संसाधन) म्हणून कार्यरत आहे. विद्युत क्षेत्रात श्री. राजेंद्र पवार यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना आयईआय संस्थेकडून हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Previous Post

श्रेयवादाच्या राजकारणात अडकले लातूरचे नाट्यगृह; नाट्यकर्मींचा संयम आता संपत चालला! पालकमंत्री यात लक्ष घालतील का…!

Next Post

राज्यपालांच्या हस्ते ‘अटल संस्मरण’ ग्रंथाचे प्रकाशन; अटलजींचे जीवन नेतृत्व, शालीनता आणि मूल्यांचा आदर्श – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

राज्यपालांच्या हस्ते ‘अटल संस्मरण’ ग्रंथाचे प्रकाशन; अटलजींचे जीवन नेतृत्व, शालीनता आणि मूल्यांचा आदर्श – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026

श्रेयवादाच्या राजकारणात अडकले लातूरचे नाट्यगृह; नाट्यकर्मींचा संयम आता संपत चालला! पालकमंत्री यात लक्ष घालतील का…!

June 26, 2026

🌧️ पावसाची प्रतीक्षा संपली; मुंबईत मान्सून दाखल, महाराष्ट्रासाठी शुभ संकेत

June 23, 2026

धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू

June 19, 2026

Recent News

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026

श्रेयवादाच्या राजकारणात अडकले लातूरचे नाट्यगृह; नाट्यकर्मींचा संयम आता संपत चालला! पालकमंत्री यात लक्ष घालतील का…!

June 26, 2026

🌧️ पावसाची प्रतीक्षा संपली; मुंबईत मान्सून दाखल, महाराष्ट्रासाठी शुभ संकेत

June 23, 2026

धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू

June 19, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

श्रेयवादाच्या राजकारणात अडकले लातूरचे नाट्यगृह; नाट्यकर्मींचा संयम आता संपत चालला! पालकमंत्री यात लक्ष घालतील का…!

June 26, 2026

🌧️ पावसाची प्रतीक्षा संपली; मुंबईत मान्सून दाखल, महाराष्ट्रासाठी शुभ संकेत

June 23, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved