• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

मनपा विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी घेतला शहर स्वच्छतेचा आढावा

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
March 27, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


नगरसेवकांशी समन्वय साधून स्वच्छता मोहिमेला गती देण्याची सुचना
लातूर/प्रतिनिधीः- स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहिमेसाठी लातूर महानगरपालिकेस देशपातळीवरचे बक्षीस मिळालेले होते. मात्र आता स्वच्छता विभागाकडून शहर स्वच्छतेला गती मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन स्वच्छता विभागाने नगरसेवकांशी समन्वय साधून प्रभागातील स्वच्छता मोहिमेला गती द्यावी अशी सुचना करून यासाठी राबविण्यात येणार्‍या मोहिमेचा अहवाल तात्काळ देण्यात यावा असे निर्देश मनपा विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी दिले आहेत.


महानगरपालिकेतील दालनात मनपा विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेऊन शहर स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी उपायुक्त वसुधा फड, स्वच्छता प्रमुख रमाकांत पिडगे यांच्यासह प्रत्येक प्रभागातील स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
दरवर्षी महानगरपालिकेच्या वतीने मान्सुनपुर्व स्वच्छता मोहिम राबविण्यात येते. याहीवर्षी ही मोहिम वेळेत सुरु करावी असे सांगून शहरातील ज्या-ज्या भागामध्ये पावसामुळे नाल्या तुंबणे किंवा रस्त्यावर पाणी येऊन दुर्गंधी पसरणे या बाबी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणची नाले सफाई शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात यावी अशी सुचना करून ज्या ठिकाणी बांधकाम विभागाची गरज आहे त्या ठिकाणी त्यांच्याशी समन्वय साधून नाल्या तुंबू नये यासाठी आवश्यक असणारी काय कार्यवाही करावी लागते आणि त्यासाठी किती निधी अपेक्षीत आहे याबाबतचाही अहवाल स्वच्छता विभागाने आगामी आठ दिवसात द्यावा अशी सुचना देविदास काळे यांनी केली.
लातूर महानगरपालिकेने मागील काळात स्वच्छतेचे चांगले काम करून देशपातळीवरचे पारितोषक मिळविले होते, याची आठवण करून देत देविदास काळे यांनी पुन्हा एकदा अशाच पद्धतीचे काम मनपाच्या स्वच्छता विभागाकडून होणे अपेक्षीत असल्याचे सांगितले. शहरातील प्रत्येक प्रभागात असलेल्या प्रत्येक घरापर्यंत घंटागाडी पोहचावी अशी सुचना करुन घंटागाडीवर असणार्‍या चालकाचे व कर्मचार्‍यांचे संपर्क क्रमाक नागरीकांपर्यंत पोहचविण्यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही तात्काळ करण्यात यावी असे सांगितले. प्रभाग निहाय स्वच्छता मोहिमेचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करुन आगामी कांही दिवसात प्रत्येक प्रभागात ही मोहिम राबविण्यात यावी असे सांगून सदर मोहिम सुरु करण्यापुर्वी नगरसेवकांशी समन्वय साधून त्यांच्याही सुचनाचा या मोहिमीत समावेश करुन घ्यावा असे सुचीत केले.
स्वच्छतेबाबत आलेल्या नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी तात्काळ प्राधान्य द्यावे असे सांगून स्वच्छता विभागाचे काम अधिक गतीने होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत जेणे करून पुन्हा एकदा लातूर महानगरपालिकेला स्वच्छतेबाबत देशपातळीवरचे पारितोषक मिळेल असा विश्वास मनपा विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी व्यक्त केला. यावेळी उपायुक्त वसुधा फड यांच्यासह स्वच्छता निरीक्षकांनी सांगितलेल्या अडचणी सोडविण्यासाठी शासन व प्रशासन दरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही देविदास काळे यांनी यावेळी दिली.

Previous Post

 लातुरात दोन दिवसीय ‘ मानसरंग’ नाट्यमहोत्सवाचे  आयोजन  

Next Post

युवकांनी समाज माध्यमांचा समतोल वापर करावा : डॉ. संदीपान जगदाळे

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

युवकांनी समाज माध्यमांचा समतोल वापर करावा : डॉ. संदीपान जगदाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

कवठा शिलालेखांचा उलगडा : नऊशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे दालन खुले

March 28, 2026

युवकांनी समाज माध्यमांचा समतोल वापर करावा : डॉ. संदीपान जगदाळे

March 28, 2026

मनपा विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी घेतला शहर स्वच्छतेचा आढावा

March 27, 2026

 लातुरात दोन दिवसीय ‘ मानसरंग’ नाट्यमहोत्सवाचे  आयोजन  

March 27, 2026

Recent News

कवठा शिलालेखांचा उलगडा : नऊशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे दालन खुले

March 28, 2026

युवकांनी समाज माध्यमांचा समतोल वापर करावा : डॉ. संदीपान जगदाळे

March 28, 2026

मनपा विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी घेतला शहर स्वच्छतेचा आढावा

March 27, 2026

 लातुरात दोन दिवसीय ‘ मानसरंग’ नाट्यमहोत्सवाचे  आयोजन  

March 27, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

कवठा शिलालेखांचा उलगडा : नऊशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे दालन खुले

March 28, 2026

युवकांनी समाज माध्यमांचा समतोल वापर करावा : डॉ. संदीपान जगदाळे

March 28, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved