• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

स्वयंस्किल्स कोर्सचे यशस्वी पूर्णत्व – विद्यार्थिनींचा गौरव

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
February 19, 2025
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“शिक्षण हेच शक्तीचे साधन आहे, आणि या विद्यार्थिनींचा प्रवास हे याचे उत्तम उदाहरण आहे.”

लातूर जिल्ह्यातील देवणी या ग्रामीण भागातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, देवणी, लातूर येथील विद्यार्थिनींनी स्वयंस्किल्स कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. हा कोर्स ग्रामीण महिला विकास संस्था यांच्या नेतृत्वाखाली, जगमंगल सोशल फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्विस-एड इंडिया तसेच युरोपियन युनियन यांच्या विशेष सहकार्यातून राबवण्यात आला.

या उपक्रमाचा उद्देश “लैंगिक अत्याचार व भेदभावाचा सामना करणे, विशेषतः घरगुती हिंसा आणि बालविवाह” या समस्यांवर लक्ष केंद्रित करून महिलांना सक्षम बनवणे हा होता.

स्वयंतेज अकादमी-लातूर द्वारे राबवलेला हा कोर्स मुलींना संवाद कौशल्य, इंग्रजी बोलणे, एम.एस. ऑफिस, इंटरनेट प्रावीण्य, जीवन कौशल्ये यामध्ये प्रावीण्य मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आला होता.

विद्यार्थिनींनी या कोर्समध्ये नियमित उपस्थिती, सक्रिय सहभाग, आणि अभ्यासातील उत्कटता यांचे उदाहरण घालून दिले. विद्यार्थिनींनी आत्मसात केलेले इंग्रजी कौशल्य उपस्थितांसमोर सादर केले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले. १२ दिवस आणि १८ तासांच्या प्रशिक्षणात स्वयंतेज अकादमीच्या प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींना घडवले. याबद्दल सर्व मान्यवर आणि विद्यार्थिनींच्या पालकांनी प्रशिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.

विद्यार्थिनींच्या समर्पण आणि चिकाटीमुळे त्या भविष्यात नक्कीच सक्षम आणि आत्मनिर्भर बनतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

यावेळी विविध मान्यवरची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राणी भंडारे (सरपंच, देवणी) होत्या. उद्घाटन माणिक डोके (पोलीस निरीक्षक, देवणी) यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून तेजस गुजराथी (संस्थापक संचालक, जगमंगल सोशल फाउंडेशन) उपस्थित होते. याशिवाय कुशावर्ता बेळे (संचालक, ग्रामीण महिला विकास संस्था), कचराताई गायकवाड (संचालक, ग्रामीण महिला विकास संस्था), गिरीश सबनीस (प्रकल्प समन्वयक), आकाश सोनकांबळे (संचालक, स्वयंतेज अकादमी लातूर), बाबासाहेब उमाटे (पत्रकार, दैनिक सकाळ) आणि प्रशिक्षक अर्पिता बिराजदार, रेणुका होनकर, सुर्योदय बोईनवाड हे मान्यवर देखील उपस्थित होते.

विद्यार्थिनीं त्यांच्या भावना व्यक्त केल्या. स्नेहा पाटील हिने आपली भावना व्यक्त करताना सांगितले, “माझ्या आयुष्यात कधीच असा कोर्स करेन असे वाटले नव्हते. आज मी इंग्रजी बोलू शकते यावर माझा विश्वास बसत नाही. आधी मी संगणक फक्त झेरॉक्स दुकानात पाहिला होता, पण या कोर्समुळे मी स्वतः लॅपटॉप हाताळला आणि वापरला. माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. यासाठी मी जगमंगल सोशल फाउंडेशन, ग्रामीण महिला विकास संस्था, स्विस-एड इंडिया, युरोपियन युनियन आणि स्वयंतेज अकादमी यांचे मनापासून आभार मानते.”

संस्कृती बिरादार हिने इंग्रजीमध्ये आपल्या कुटुंबाबद्दल आणि मित्रांबद्दल सादरीकरण केले. तिने कोर्समधून काय शिकलं हे सर्व उपस्थितांसमोर सांगितलं आणि तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणावर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात तिचे कौतुक केले.

मोनिका बिरादार हिने सांगितले, “मी कधी १५ ते २० किलोमीटर प्रवास करून शिकेन असे वाटले नव्हते. सुरुवातीला माझ्या कुटुंबाने या प्रशिक्षणासाठी विरोध केला होता, पण ग्रामीण महिला विकास संस्था यांच्या मदतीने माझे कुटुंब तयार झाले. आज मी स्वतःला इंग्रजीत सादर करत आहे, याचा मला खूप आनंद आहे. यासाठी मी स्वयंतेज अकादमीच्या प्रशिक्षकांचे आभार मानते.”

मान्यवरांनि आपले मनोगत व्यक्त केले माणिक डोके यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले, “महिलांनी केवळ शिक्षण घेऊन थांबू नये, तर समाजातील अन्याय आणि भेदभावाविरोधात उभं राहावं.”

राणी भंडारे (सरपंच) यांनी आपल्या भाषणात सांगितले, “मुलींनी शांत न राहता पुढे आले पाहिजे आणि विविध कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. हा उपक्रम ग्रामीण भागातील मुलींना सक्षम करण्यासाठी मोलाची भूमिका बजावतो.”

कुशावर्ता बेळे यांनी सांगितले, “आम्ही बालविवाह, लैंगिक अत्याचार, भेदभाव आणि घरगुती हिंसेविरोधात कार्य करत आलो आहोत. पण जेव्हा आम्ही आकाश सर आणि तेजस सर यांना भेटलो आणि अच्युत  बोरगावकर यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे, आम्ही आणि जगमंगल सोशल फाउंडेशन ने पुढाकार घेऊन हा कोर्स सुरू केला. या कोर्ससाठी आसपासच्या १० गावांमधील ६० मुलींनी सहभाग घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे हास्य पाहून आम्हाला खूप समाधान वाटत आहे.”

तेजस गुजराथी यांनी या कोर्सच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल सांगितले आणि विद्यार्थिनींना आपली मनोगते व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले.

उपस्थिताकडून सर्व विद्यार्थिनींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि यशासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांची वृक्षरुपी आगळीवेगळी जयंती

Next Post

स्वयंस्किल्स कोर्सचे यशस्वी पूर्णत्व – विद्यार्थिनींचा गौरव

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

स्वयंस्किल्स कोर्सचे यशस्वी पूर्णत्व – विद्यार्थिनींचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

कृषी सेवारत्न पुरस्काराबद्दल सूर्यकांत लोखंडे यांचा सत्कार

September 21, 2026

Recent News

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

कृषी सेवारत्न पुरस्काराबद्दल सूर्यकांत लोखंडे यांचा सत्कार

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved