सह्याद्री देवराई, लातूर वृक्ष चळवळ, सायकलिस्ट ग्रुप, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय यांचा अभिनव उपक्रम,
दोनशे पेक्षा जास्त झाडांचा केला सहावा वाढदिवस, तसेच वृक्षारोपण करून साजरी केली जयंती ,

सहा वर्षांपूर्वी २०१९ मध्ये लावलेल्या वडाच्या झाडांचा असलेला प्रकल्प म्हणजे रायगड ऑक्सिजन झोन हा औसा रोड वरील शासकीय तंत्रनिकेतन मुलांच्या वस्तीग्रह मध्ये आहे.

येथील दोनशे पेक्षा जास्त झाडांचा वाढदिवस साजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सह्याद्री देवराई, लातूर वृक्ष चळवळ, सायकलिस्ट क्लब लातूर, सांस्कृतिक फाउंडेशन च्या वतीने निसर्ग प्रेमी सदस्यांनी केली .२०१९ ला लातूरच्या सात सायकल स्वारानी सात वडाची झाडे लावून शिवजयंतीनिमित्त रायगड कडे सायकलवर कूच केले होते. आज त्या सात वडासोबत इतर एकूण अठरा वडाची झाडे असलेला हा वडांचा ऑक्सिजन झोन आहे.

तसेच अजून इतर वनस्पती बकुळ, पारिजातक, बहावा, पिंपळ ,कडूलिंब, चिकू, कुचला , शिरीष, आकाश मोगरा अशी अनेक झाडे या परिसरात आहेत. अश्या दोनशे पेक्षा जास्त झाडे असलेल्या या सर्व झाडांचा वाढदिवस आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य नितनवरे सर व ॲड कालिदासराव देशपांडे , सह्याद्री देवराईचे समन्वयक सुपर्ण जगताप , सायकलिस्ट ग्रुपचे सतीश खोबरे ,संस्कृती फाऊंडेशनचे अभय मिरजकर, डॉ बी आर पाटील, प्रा संभाजी पाटील, यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी वृक्ष चळवळीचे शहरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणी, सायकलिस्ट ग्रुपचे सर्व सायकल्सवर , निसर्ग प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी निसर्ग झाडे जतन होण्यासाठी जे आज्ञापत्र काढले होते. या विषयी माहिती यावेळेस देण्यात आली, तसेच अनेक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सर्वांनी मिळून सामुहीक पणे बहावा या फुलाच्या झाडाचे वृक्षारोपण केले. तसेच कवी लेखक अरविंद जगताप यांची झाडावर लिहलेली जी प्रार्थना झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे ही सामूहिकपणे म्हण्यात आली. वडाच्या झाडाच्या सोबत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले . आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं चांगभलं वडाच्या नावानं चांगभलं घोषणा देत जयंतीची सांगता उत्साह पूर्ण वातावरणात निसर्ग जतन करण्याचा संदेश देत करण्यात आली.

अशा आगळ्यावेगळ्या निसर्गमय जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांनी बोलून खूप कौतुक केले. यावेळी विवेक नरहरे, भीम दुनगावे, गणेश माशाळकर ,अतिश नवले, विशाल कांबळे चैतन्य हास्य मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

