लातूर दि. ८(प्रतिनिधी)- बांधकामाच्या गुत्तेदाराकडे काम करणाऱ्या कामगाराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुत्तेदाराच्या या मारहाणीत बांधकाम मिस्त्रीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उदगीर येथे घडली आहे. माझ्याकडे काम करा, दारू मिळेल. जेवण मिळेल, मात्र मजुरी मिळणार नाही. मजूरी मागितली तर मार मिळेल. कुठे काम करण्याच्या लायक ठेवणार नाही. अशी धमकी देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.
उदगीर येथे काम करणारा भाचा अजय गायकवाड आणि मामा तानाजी सोनकांबळे हे सेंट्रींग मिस्त्रीचे काम करतात. मी तुम्हाला जेवण देईल, दारू देईल, मात्र मजुरी देणार नाही. या अटीवर काम करायला या. मजुरी मिळणार नाही आणि मजुरी मागितले तर मार मिळेल. किंबहुना कुठेही काम करण्याच्या लायकीचे ठेवणार नाही. अशी धमकी गुत्तेदार मेहराज पटेल देत होता. त्यांना मारहाण केली.
उपचारादरम्यान तानाजी सोनकांबळे यांचा मृत्यू
अजय गायकवाड तीथून पळून मुंबईकडे पळून गेला. मामा तानाजी सोनकांबळे हा गुत्तदाराच्या हाती सापडला होता. बेदम मारहाण केल्यानंतर गाडीत घालून उदगीर येथे त्याला सोडण्यात आलं. उदगीर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर तानाजी सोनकांबळे यांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र ही मारहाण इतकी जबर होती ही उपचारादरम्यान तानाजी सोनकांबळे यांचा मृत्यू झाला .

