बापाचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
देवणी तालुक्यातील इंद्राळ येथे बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची घटना घडली.याप्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दिल्यावरुन देवणी पोलिसांत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र जागतिक महिला दिनाच्या तोंडावर बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील इंद्राळ येथे ४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास रात्री झोपेत असलेल्या आपल्या पोटच्या मुलीवरच वाईटहेतुने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.यावेळी मुलीने ओरडण्याने मी जावुन पाहिले शिवाय मी पतीला विचारणा केली असता मलाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून पळवुन गेल्याची तक्रार आपल्या पतीच्या विरोधात दिली.याबाबत देवणी पो स्टे गुरनं ५४/२५ कलम ७४,७५ BNS व सह कलम ८, १२ पोस्को अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपी धोंडिबा मुरारी कांबळे याला न्यायालयात हजर केले असता आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि गौड हे करीत आहेत.
सदरील घटनेबाबत तालुक्यातुन संताप व्यक्त होत आहे.शिवाय आरोपीस अपंग पत्नी,सात मुली व एक मुलगा असताना ही घडलेली घटना अत्यंत निंदनीय असल्याचे बोलले जाते

