
लातूर दि. ७ जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यासाठी ‘मान्विथा कर्मसिध्दी पुरस्कार वितरण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दयानंद कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरण व सायबर क्राईमला आळा बसवणारे अत्यंत प्रभावी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.
या पथनाट्यातून महिलांविरुद्ध इंटरनेट, मोबाइल, किंवा डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणारा छळ, धमकी, किंवा अपमान इत्यादी विषयावर प्रबोधन केले. सायबर गुन्ह्यांसाठी कोणत्या कायदेशीर तरतुदी आहेत याची माहिती यातून देण्यात आली. या प्रसंगी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, जिल्हा परिषदेचे मुखयाधिकारी राहुल कुमार मीना ( भा. प्र. से.), निवासी उजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पथनाट्यात दयानंद कला महाविद्यालयात इयत्ता अकरावी शिकणाऱ्या ममता पिंपळे, दिव्यांजली गायकवाड, संगीता कांबळे, प्रांजल सोनकांबळे, शिवम उदारे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. पथनाट्याचे लेखन ज्योतिबा बडे यांनी केले तर दिग्दर्शन श्रीनिवास बरीदे याने केले.
सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ.दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, सांस्कृतिक विभागाचे डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. अंजली बनसोडे, प्रा. मनोज गवरे यांनी मार्गदर्शन केले आहे.

