- प्रा. अरविंद खोत
लातूर, दि.९, आपल्या प्रत्येक वयोवृद्ध थोर व्यक्तीसंबंधी सातत्याने आदर-सन्मान बाळगणारा समाज हा, कुटुंब संस्थेचे अधिक महत्व जाणणारा असतो, असे मत प्रा. अरविंद खोत यांनी व्यक्त केले. ते आज ९ मार्च रोजी लातूर येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यानामध्ये, सकाळ मित्र समूह परिवाराच्यावतीने आयोजित केलेल्या, ज्येष्ठ शेतकरी नागरिक श्री हरिश्चंद्र घोलप यांच्या सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुभाष पासमे आनंदवाडीकर हे होते.
यावेळी बोलताना प्रा. खोत पुढे म्हणाले की, जीवनातील बाजारु वाढती स्पर्धा आणि भविष्यकालीन अनिश्चित शास्वतीच्या सुप्त भयाने व्यक्ती अस्थीर होत चालला आहे. त्यातही अपेक्षा व वास्तवाचा ताळमेळ बसत नाही. म्हणून व्यक्ती काहीसा संकुचित होऊन स्वार्थाकडे झुकतो. त्याचे आघात कुटुंब आणि नात्यावर होतात. अशा अलिप्त व लहान परिवारांची, पुन्हा आपोआप अगतिक गुंतागुत वाढते. आणि त्यातूनच वृद्धाश्रय, अनाथाश्रम, पाळणा गृह आदींची वाढ तरी होतेच. पण कलह, हत्या, आत्महत्या वा अन्य गैर मार्गाचा शिरकाव होतो. म्हणून सर्वोत्तम असलेली येथील एकत्र कुटुंबसंस्था ही भक्कम ठेवावयाची असेल तर, समाजातील वृद्ध, बालक व स्त्रियाप्रती कायम संवेदनशीलता बाळगावी, असे आवाहनही प्रा. अरविंद खोत यांनी केले. प्रारंभी ज्येष्ठ नागरिक तथा शेतकरी श्री हरिश्चंद्र घोलप यांना स्नेहींच्यावतीने शॉल, फेटा, पुष्पहार, पुष्पगुच्छ व एक स्वप्रतिमा प्रदान करून, त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्री बंकटराव कांबळे, प्रा. रामकिशन संमुखराव व श्री गणपतराव तेलंगे यांची समायोचित भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रकाशराव बंडापल्ले बामणीकर यांनी केले. तर सूत्रसंचालान श्री विजयराव चव्हाण यांनी केले. आणि आभार प्रदर्शन श्री माधवराव तेलंगे जानवळकर यांनी केले. या समयी श्री माधवराव बाकारे, श्री हैबतराव माने, श्री गंगाधर नागरगोजे, श्री दामोधरअण्णा नाळापूरे, श्री दतात्रय कल्लेकर, बाबुराव बेळशेटे, किसनराव नागटिळक, मारोतीराव सुर्यवंशी, एएसआय गणपतराव डावरे, दत्तात्रय मुंडे, अंकूश कांबळे, वसंतराव चव्हाण, गोरोबाकाका शिंदे, माजी सरपंच माधवराव गायकवाड, अकुंशराव देवकते, टी. डी. बलांडे, सुनील शिंगे, श्री प्रकाश मुळे, पीएसआय शिवाजीराव तरुडे, बालमोहन बनसोडे, के एम भडीकर, दलित मित्र सुरेश चव्हाण, दिगंबरराव बारसकर, सुरेश सरवदे, मु.अ. गणपतराव पंडगे, श्री शशिकांत बस्तापुरे, गणपतराव केसाळे, समाधान रसाळ, प्रकाश बनसोडे, शिवाजीराव कांबळे, रामकुमार रायवाडीकर व बापुराव गायकवाड आदी उपस्थित होते.
-----------------------
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...