
राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था,पुणे व महाराष्ट्र योग व प्राकृतिक चिकित्सा आयुर्विज्ञान परिषद , प्रणव निसर्गोपचार व योग केंद्र, नंदनवन कॉलनी, कव्हा रोड लातूर, यांच्या सहकार्याने योग व निसर्गोपचार द्वारे वृद्धावस्थेत आरोग्याची काळजी या विषयावर रविवार 9 मार्च रोजी शिवनी (बु)ता.औसा,जि.लातूर व सोमवार 10 मार्च रोजी हरंगुळ खुर्द ता. जि. लातूर सकाळी 9 ते दुपारी 2 यादरम्यान शिबिर घेण्यात आले.यामध्ये वाढत्या वयाबरोबर हृदयाची काळजी या विषयावर डॉ.विवेक चांद पूर्व रिसर्च प्रोजेक्ट सायंटिस्ट आय.सी.एम.आर, योगिक हृदयविकार पुनर्वसन रिसर्च प्रोजेक्ट (योग केयर) यांनी मार्गदर्शन केले पुढे बोलताना ते म्हणाले कि वाढत्या धकाधकीच्या जीवनात ताण तणाव, प्रसंगीकृत खाद्य, व खराब जीवन पद्धतीमुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढून हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे यासाठी नैसर्गिक जीवन पद्धती व जीवनामध्ये योगातील भ्रामरी प्राणायामाचा सराव करून व आहारामध्ये नायट्रेट रिच आहार बीट रूट , गजर,हिरव्या पालेभाज्या आपण हृदय विकार रोखू शकतो.

तसेच वाढत्या वयाबरोबर हाडांची काळजी या विषयावर डॉ.सृष्टी पंचाक्षरी-सगरे पाटील (बी एन वाय एस ,बेंगलुरु) या मार्गदर्शन केले त्यापुढे बोलताना म्हणाल्या की आहारामध्ये भरडधान्य वापर केल्यास कॅल्शियमची कमतरता भरून निघते व हाडे मजबूत राहतात त्याचबरोबर नियमित नैसर्गिक जीवन पद्धती व योगाचा वापर केल्यास मन प्रसन्न राहून अस्थिरता दूर होते व अस्थि बळकट होतात.

आनंदी जीवनाची गुरुकिल्ली योग व निसर्गोपचार या विषयावर डॉ.किरण सगरे पाटील हे मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाले की निसर्ग माणसाच्या गरजा पूर्ण करू शकतो पण त्याचा हव्यास नाही , स्वतःची ओळख न पटल्यामुळे विनाकारण स्पर्धात्मक तुलना करून माणूस मानसिक व शारीरिक आरोग्य खराब करून घेत आहे जगण्याचा खरा अर्थ प्रवासाचा आनंद घेत जगणे हाच आहे, आणि तो योग निसर्गोपचार जीवन पद्धतीमध्ये सहज शक्य आहे.

शिबिरात रुग्णांची बीपी व शुगर चेक करून, त्यांना निसर्गोपचार पद्धतीचे मार्गदर्शन तसेच स्थानिक मालिश वाफेचा शेक, सूक्ष्म व्यायामव, ॲक्युपंक्चर, पौष्टिक दलिया व खजूर यांचा अल्पोपवार देण्यात आला.

पाचशेच्या वर वृद्धांनी शिबिराचा फायदा घेतला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवनी(बु) येथील पृथ्वीराज तथापुरे ,सरपंच शिवम बुके, विजय पाटील,शुभम मुदाळे, प्रियंका सगरे पाटील व सुप्रिया सगरे पाटील
व हरंगुळ खुर्द येथील सोमनाथ झुंजे पाटील व शिवमुर्ती झुंजे पाटील यांनी पुढाकार घेऊन शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

