लातूर/प्रतिनिधी :लातूर शहर महानगरपालिका मार्फत मनपा मालकीच्या सॉ-मील येथे आयुक्त, बाबासाहेब मनोहरे यांच्या आदेशान्वये उपायुक्त,डॉ. पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. १५/०३/२०२५ रोजी मालमत्ता व्यसवस्थापक शुभम बावणे व अतिक्रमण विभाग प्रमुख रवी कांबळे यांच्या उपस्थितीत सॉ-मीलमध्ये धडक वसुली मोहिम राबविण्यात आली होती. सदर सॉमीलमध्ये आज रोजी चेक व्दा रे रक्केम रु ५,४६,९७८/-व नगदी २,५०,०००/-असे एकूण ७,९६,९७८/- रु आज रोजी वसुली करण्यात आलेली आहे. तसेच सदर सॉ-मीलधारकांपैकी ३ सॉ-मील मधील ६ आरा मशीन थकबाकी रक्कम रु ३४,५८,५१२/- साठी सिल करण्यात आल्या आहेत. तसेच याव्दारे सिल करण्यात आलेल्या सॉ-मीलधारकांना सूचित करण्यात येते की आपल्याकडील थकबाकी भरणा करुन घेण्यात यावी. अन्यथा सदर सॉ-मील जागांचा ई-लिलाव करण्यात येईल. व ज्या सॉ मीलधारकांकडे थकबाकी आहे असे सॉ मीलच्या जागा मनपा मार्फत सिल करुन सदर जागांचा ई-लिलाव ची होणारी कटू कार्यवाही टाळावी असे आवाहन उपायुक्त, डॉ.पंजाब खानसोळे यांनी केले आहे.
—


