• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या प्रा. तानाजी भोसले यांना ‘नॅशनल टीचर्स पुरस्कार’

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
March 11, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर : शिक्षण हीच समाजपरिवर्तनाची खरी शक्ती आहे, या विचाराने झोपडपट्टी व मागास भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने काम करणारे महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय, सुळ गल्ली (लातूर) येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. तानाजी विठ्ठलराव भोसले यांना “नॅशनल टीचर्स पुरस्कार २०२६” प्रदान करून गौरविण्यात आले.

पुणे येथील स्विफ्टन लिफ्ट एज्युकेशन मीडिया ग्रुपतर्फे आयोजित भव्य समारंभात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला मंदिर, पुणे येथे हा सन्मान प्रदान करण्यात आला. शिक्षण, सामाजिक कार्य आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रा. भोसले यांना देण्यात आला.

प्रा. भोसले यांनी अनेक वर्षांपासून झोपडपट्टी तसेच मागास भागातील दलित, मुस्लिम आणि मजुरी करणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी संत कबीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून राष्ट्रभाषा हिंदीच्या प्रसारासाठी विविध उपक्रम राबविले. तसेच राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे कामही त्यांनी सातत्याने केले आहे.

या कार्याची दखल घेत इंडियन आर्मीचे लेफ्टनंट कमांडर शीतल गायकवाड, येवले अमृततुल्यचे संस्थापक नवनाथ येवले, चाकण फेडरेशन इंडस्ट्रीचे चीफ एक्झिक्यूटिव्ह दिलीप बतवाल, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष नेहा गोरे, भाजप पुणे शहर सरचिटणीस प्रियंका शेंडगे-शिंदे तसेच स्विफ्टन लिफ्टचे संस्थापक निलेश साबे यांच्या हस्ते प्रा. भोसले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रा. तानाजी भोसले हे संत कबीर प्रतिष्ठान, लातूरचे नियामक मंडळ सदस्य, वसंतराव काळे शिक्षक पतसंस्थेचे माजी सचिव तसेच महाराष्ट्र राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेचे लातूर विभागीय सचिव म्हणूनही सक्रिय आहेत. शिक्षणाबरोबरच समाजाभिमुख कार्यातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव जागविण्याचे काम केले आहे.

या पुरस्काराबद्दल शिक्षक आमदार विक्रम काळे, संस्थेचे सचिव संभाजी सुळ, माजी महापौर दीपक सुळ, प्रा. अंकुश नाडे, डॉ. रणजीत जाधव, डॉ. सतीश यादव, प्राचार्य महादेव गव्हाणे, प्राचार्य बबन बोडके, डॉ. दिलीप गुंजरगे, श्री दीपक सलगर, श्री मदन धुमाळ, श्री गंगाधर आरडले, श्री दयानंद कांबळे, डॉ. हणमंत पवार, डॉ. मैनोद्दीन शेख, श्री तानाजी पाटील, डी.एस. ग्रुपचे तुकाराम भैय्या पाटील, श्री संतोष बिराजदार, प्रा. सुहास पाचपुते, प्रा. सुनील नावडे, प्राचार्य रामदास फेरे, प्राचार्य आर.डी. निटूरकर, पर्यवेक्षक संतोष गुरव, कवी रामदास कांबळे, डॉ. गणेश बेळंबे, प्राचार्य राजाराम भिसे, डॉ. अयुब पठाण, मुख्याध्यापक युवराज शिंदे, श्री सय्यद गफार यांसह अनेक मान्यवरांनी प्रा. भोसले यांचे अभिनंदन केले.

शिक्षण आणि समाजसेवेची सांगड घालत विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अखंड कार्य करणाऱ्या प्रा. तानाजी भोसले यांच्या या सन्मानामुळे लातूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


Previous Post

स्वीकृत सदस्य: तज्ज्ञ की राजकीय समायोजन? — कायद्याच्या हेतूची उघड पायमल्ली

Next Post

“इतरांना फायर ऑडिटचा आदेश… पण स्वतःच्या इमारतीच धोक्यात! लातूर महापालिकेचा निष्काळजीपणाचा कळस”

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

“इतरांना फायर ऑडिटचा आदेश… पण स्वतःच्या इमारतीच धोक्यात! लातूर महापालिकेचा निष्काळजीपणाचा कळस”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

September 2, 2026

आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची ४ कारणे

September 1, 2026

Recent News

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

September 2, 2026

आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची ४ कारणे

September 1, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved