
येथील आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १२१ व्या आवर्तन मासिक संगीत सभेमध्ये मुंबई येथील प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका विदुषी अर्चना कान्हेरे यांचे गायन होणार आहे.

अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी मागील १२० महिन्यांपासून लातूरमध्ये आवर्तन मासिक संगीत सभेचे आयोजन केले जाते, या मासिक संगीत सभेमध्ये आजपर्यंत भारतातील अनेक दिग्गज कलावंतांनी आपले गायन वादन तसेच नृत्य सादर केले आहे.
आज शनिवार दिनांक २२ मार्च २०२५ रोजी होणारी आवर्तन मासिक संगीत सभा स्वर्गीय गौरव शहा यांच्या स्मृती प्रित्यर्थ शहा परिवाराने आयोजित केली आहे, आज होणाऱ्या या १२१ व्या मासिक संगीत सभेमध्ये मुंबई येथील प्रसिद्ध जेष्ठ गायिका विदुषी अर्चना कान्हेरे यांचे गायन होणार आहे, यांना तबला साथ लातूर येथील सुप्रसिद्ध तबला वादक श्री. संजय सुवर्णकार व संवादिनी साथ प्रा.शशिकांत देशमुख हे करणार आहेत. ही संगीत सभा आज सायं ६:३० वाजता, गणेश हॉल अष्टविनायक मंदिर लातूर या ठिकाणी होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आवर्तन प्रतिष्ठान परिवार तसेच संपूर्ण शहा परिवाराच्या वतीने केले आहे.

