- हभप ज्ञानसागर पुरीमहाराज
लातूर, दि.२१, येथील थोर संताच्या ज्ञान आणि त्यागामुळेच, आपला मानवी समाज अधिक समृद्ध झाला असे प्रतिपादन, हरी भक्त परायण श्री ज्ञानसागर महाराज पूरी यांनी केले. संत एकनाथ महाराज षष्ठीदिनी, २० मार्च रोजी पर्यवेक्षिक दिवंगत सौ. सुजाताताई माधवराव गायकवाड यांच्या स्मृतिनिमित्त नाथनगर लातूर येथे आयोजित केलेल्या किर्तनी अंभग विवेचन प्रसंगी बोलत होते.
प्रारंभी विठ्ठल रुक्मिणी व दिवंगत सौ.सुजाताताई गायकवाड यांच्या प्रतिमांना पुष्पमाळा अर्पण करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या, " आपुला एक देव करूनी घ्यावा " या अभंगावर बोलताना ज्ञानसागर महाराज पुढे म्हणाले की, संत महापुरुषांनी गुणी भक्तांना प्रमुख पाच कर्तव्य ऋणाची दिक्षा दिली आहे. येथील प्रत्येक भक्त कुंटूब सदस्याने त्याचे, आपल्या जीवनात पालन करणे महत्वाचे आहे. संताचे मानवावर अनंत उपकार आहेत. ते माता-पित्या इतकेच श्रेष्ठ व थोर आहेत. संताच्या उदार संस्कारावरच आपली संरचना आणि व्यवहार तरलेला आहे. त्यामुळे अशा श्रेष्ठ मुल्यांची उपेक्षा होऊ नये म्हणून, समाजाने सतत सावधगिरी बाळगावी असे आवाहनही त्यांनी केले.
त्यानंतर या गायकवाड येळीकर परिवाराच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी उपक्रम म्हणून प्रसिद्ध युवा समाजसेवक श्री शिवाजीराव अंबादासराव जाधव व श्री सूरज रामराव भुसारेपाटील यांचा शॉल व पुष्पहार घालून, माजी सरपंच श्री माधवराव गायकवाड यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी हभप बालाजी महाराज येळीकर, श्री दिलीपगुरुजी किनीकर, सचिन जाधव, महेश वंगवाड, उद्धवराव करडीले, शिवाजीराव जानवळकर, गोविंद मडोळे, राजकुमार पाटील, संतोष भुजबळ, नारायणराव भोसले, बब्रूवान जाधव, सुभाष किरवले पाटील, हरिभाऊ गायकवाड, सुभाषराव जाधव, यादव गायकवाड, संजीवनीताई जाधव, हभप सौ.मंदाकिनी पांडूरंगराव शिंदे गांजूरकर, राम जाधव, रोहित गायकवाड, महेश जाधव, निकेश गायकवाड, सौ तेजाबाई जाधव, निलेश गायकवाड, विलास जाधव, शिवम् गायकवाड, राधिकाबाई जाधव, सुनीता गायकवाड, वैशाली जाधव, बेबीनंदा गायकवाड, संजय व्यवहारे, चित्रा गायकवाड, माधव सुर्यवंशी, मुक्ता गायकवाड, नंदाताई गायकवाड, शितल जाधव, हरिभाऊ जगळपूरकर, प्रकाश हैद्राबादे, प्रा. व्ही. डी. वाघमारे, अमोल सुर्यवंशी, ज्ञानोबा जगळपूरकर, गोपाळराव चिकाटे, श्री सुरेश चव्हाण, आत्माराम गिरी, शंकरराव तरुडे, संभाजीराव दोरवे आदी उपस्थित होते. महाप्रसादाने या दोन दिवशीय कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...