
आज लातूर येथे सह्याद्री देवराई च्या पर्यावरण सन्मान सोहळ्यात विविध महिलांचा सत्कार करताना ते हाँटेल अंजनी येथील सभागृहात बोलत होते.
सह्याद्री देवराईशी संलग्न होऊन काम करणाऱ्या सनराईज योगा स्टुडिओ च्या संचालीका नंदिनी पडिले व पन्नास एक निसर्ग प्रेमी महिलांनी महाराष्ट्रातील जवळपास दुर्मिळ अश्या दोनशे वनस्पतींची माहिती ही एका प्रकल्पा अंतर्गत एकत्रित करुन ५० फाईल बनवून त्या आज रोजी सह्याद्री देवराईचे अरविंद जगताप व सुपर्ण जगताप यांच्याकडे सुपूर्द केली.
दोन महिन्यापूर्वी सह्याद्री देवराई चे सर्वेसर्वा सिने अभिनेते सयाजी शिंदे व सह्याद्री देवराईचे समन्वयक सुपर्ण जगताप यांनी या निसर्ग पर्यावरणावर प्रेम करणा-या विविध क्षेत्रातील शिक्षिका, डाॅक्टर, गृहिणी अश्या सर्व महिलांची बैठक घेऊन त्यांना हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवाहन केले होते. जवळपास या दोनशे वनस्पतींचे त्यात मास रोहिणी, काळाकुडा, मेंढशिंगी, देवसावर, सोनसावर , शिवण , रान पांगरा, भोकर, हुंब, हेकळ, गोकर्ण, हिवर, उंडी, करवंद, कारं, मोह, पार जांभुळ, शिरीष, अर्जुन, काटेसावर, अश्या विविध दोनशे वनस्पतींची माहिती आहे.


हे सर्व माहिती एकत्रित करुन एक छोटे पुस्तक सह्याद्री देवराई तर्फे तयार करण्यात येत आहे. आणि हे पुस्तक भविष्यात लहान शालेय मुलांना या वनस्पतींचे ज्ञान मिळावं म्हणून शिक्षण विभागाला विनंती करून देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात या सगळ्या वनस्पतींची बीज संकलन हे महाराष्ट्रातील सहाही विभागात देवराई तर्फे सुरू करण्यात आली आहे.

यामध्ये कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश ,मराठवाडा आणि विदर्भ असे सहा विभाग आहेत.
या सहा विभागात बीज महोत्सव करण्याची महत्त्वाची जिम्मेदारी आपल्याला लातूर ला मिळाली आहे. या सहाही विभागात सहा झोन वाईज पर्यावरणात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांच्या सहा टीम बनवण्यात आल्या आहेत.


महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा उत्सव २६ एप्रिल रोजी पुणे येथे होणार आहे असे सह्याद्री देवराई चे समन्वयक सुपर्ण जगताप यांनी प्रास्ताविक करताना सांगितले .
कवी लेखक सह्याद्री देवराई चे अरविंद जगताप यांनी या महिलांचे व या प्रकल्पाचे खूप कौतुक केले आणि या सर्व महिला सहकाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले ज्या कार्यात स्त्रीचा सहभाग असतो आणि सहभाग असल्यानंतर जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही .
फक्त तिला प्रेम आणि सन्मान देता आला पाहिजे तर आपला समाज खूप प्रगत होईल. स्त्रीशक्तीने ठरवल्यावर जगात कुठलंच काम अशक्य नाही असेही ते यावेळी म्हणाले. तसेच यावेळी सर्व महिलांच्या आग्रहा खातर त्यांनी काही पत्र वाचन देखील केले.
सह्याद्री देवराई तर्फे हा सर्व प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सह्याद्री देवराईच्या नुतन सदस्या तथा सनराईज योगा स्टुडिओच्या संचालिका नंदिनी पडिले यांना सिने अभिनेते सयाजी शिंदे व कवी लेखक अरविंद जगताप यांच्या स्वाक्षरीने लिहिलेले एक सन्मान पत्र अरविंद जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.
तसेच या प्रकल्पात सहभागी सहभागी ५० महिला सदस्यांना देखील सन्मानपत्र कवी अरविंद जगताप, द्वारकादास श्याम कुमार चे तुकाराम पाटील , सह्याद्री देवराई चे समन्वयक सुपर्ण जगताप, डॉ आरती झंवर, राजस्थानी महिला मंडळाच्या अर्चना सोमाणी, रूपाली बोराडे पाटील, सपना मशरु , धवल मशरू, डॉ बी आर पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला सह्याद्री देवराई लातूरचे स्थानिक डॉ दशरथ भिसे, भीम दुनगावे , अमृत सोनवणे, प्रशांत हल्ले, डॉ गणेश गोमारे, हे देखील उपस्थित होते.

