• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

नारी हीच नारायणी : दर्जी बोरगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
March 14, 2026
in Blog
0
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर | दि. १३ मार्च २०२६

ग्रामीण महिलांचा सर्वांगीण विकास, कौशल्यवृद्धी आणि सूक्ष्म उद्योजकतेतून आर्थिक सक्षमीकरण या उद्देशाने मौजे दर्जी बोरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी शिबिराच्या निमित्ताने महिला मेळाव्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. एडिएम ॲग्रो, लातूर आणि कृषि महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाच्या विविध पैलूंवर सखोल विचारमंथन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी “नारी हीच नारायणी आहे” असे प्रतिपादन करत महिलांच्या सामर्थ्याचा गौरव केला. अध्यक्षस्थानी दर्जी बोरगाव येथील महिला बचत गटाच्या सौ. मुक्ताताई माने होत्या. मार्गदर्शक म्हणून हराळी येथील कृषि तंत्र विद्यालयाच्या प्राचार्या सौ. गौरी कापरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश दादा, सौ. मंगला कुलकर्णी, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. ज्योती देशमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिलकुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर कु. वैष्णवी हिरे व कु. सानिका मोरे यांनी सादर केलेल्या मंजुळ स्वागतगीताने वातावरण भारावून गेले.

उद्घाटक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ औपचारिक उपक्रम नसून समाजहितासाठी नवा मार्ग शोधण्याची प्रेरणादायी प्रक्रिया असल्याचे सांगितले. त्यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या तीस वर्षांच्या लोककल्याणकारी आणि मुत्सद्दी राज्यकारभारातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. अहिल्यादेवींनी स्वतःचा खजिना प्रजेच्या कल्याणासाठी खर्च करून निस्वार्थ सेवेचा आदर्श घालून दिला, असे त्यांनी नमूद केले. महिलांनी घर सांभाळतानाच वेळ आल्यास देशरक्षणाची जबाबदारीही समर्थपणे पार पाडली आहे, त्यामुळेच “नारी हीच नारायणी आहे,” असे ते म्हणाले.

मार्गदर्शक म्हणून बोलताना सौ. गौरी कापरे यांनी विशेष निवासी शिबिर हे केवळ सामाजिक कार्यापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीची ‘संस्कारांची शाळा’ असल्याचे सांगितले. त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टी, मुत्सद्देगिरी आणि कुशल नेतृत्वाचा उल्लेख करत त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचे आवाहन केले.

यावेळी स्नेहल बावले हिने स्त्रियांच्या आर्थिक सक्षमीकरणावर आपले विचार मांडले, तर विशाल सोनवणे याने ग्रामीण भागातील विविध समस्यांवर उहापोह केला.

अध्यक्षीय समारोपात सौ. मुक्ताताई माने यांनी महिलांना बचतीचे महत्त्व पटवून देत बचत हीच आत्मनिर्भरतेची गुरुकिल्ली असल्याचा मोलाचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आदिती आचार्य हिने केले. प्रास्ताविक डॉ. ज्योती देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन समीक्षा देशमुख हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. नितीन तांबोळी, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर, दशरथ सुरवसे, उत्तम पवार, दीपक जाधव, पल्लवी बनसोडे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक-स्वयंसेविका यांचे सहकार्य लाभले.

या महिला मेळाव्यास शेतकरी, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम ग्रामीण समाजजीवनात नवी प्रेरणा निर्माण करणारा ठरला.


Previous Post

लातूरच्या वाहतूक कोंडीवर निर्णायक कारवाईची चाहूल; प्रशासनाचा ‘अॅक्शन मोड’

Next Post

बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

September 2, 2026

आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची ४ कारणे

September 1, 2026

Recent News

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

September 2, 2026

आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची ४ कारणे

September 1, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved