आपले वीजबील, आपलीच जबाबदारी गृहीत धरून ३१८९ वीजग्राहकांनी ३४ लाख ३१ हजाराचा केला भरणा, जनमित्रांच्या प्रयत्नांना यश

लातूर, दि.२४ मार्च: महावितरणची मार्च अखेरची मागणी व थकबाकी वसुलीसाठी सर्व अधिकारी कर्मचारी भर उन्हात फीरत आहेत. मात्र निलंगा विभागांतर्गत येणाऱ्या २२ गावांनी वीजबिलांची थकबाकी शुन्य करीत एक नवा पायंडा निर्माण केला आहे. निलंगा-२, कासार शिरसी, औसा दक्षीण, किल्लारी-१ व २, लामजना-१ व २, अंबुलगा तसेच शिरूर अनंतपाळ शाखा कार्यालयांनी पथदर्शक पाऊल उचलत देय तारखेच्या आत चालू महिन्याचे वीजबील व थकबाकी शंभर टक्के वसूल करण्यात यश मिळवले आहे.
या यशाचे मानकरी असलेले सर्व तंत्रज्ञ, जनमित्र, लेखाधिकारी, मानव संसाधन विभागाचे कर्मचारी तसेच सर्व अभियंते यांचा मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता मदन सांगळे तसेच कार्यकारी अभियंता संजय पोवार यांनी अभिनंदन केले असून केला असून प्रत्येक जनमित्रांनी असा आदर्श समोर ठेवून मार्च अखेर संपूर्ण विभाग थकबाकीमुक्त करावा असे अवाहन केले.
मार्च अखेर चालू देयक व थकबाकी वसुलीसाठी महावितरणने कंबर कसली असून विविध उपाययोजना करून सांघिक कार्यालयाने दिलेले वसुलीचे उदिष्ट पुर्णत्वास नेण्यासाठी उन्हाची पर्वा न करता दिवसभर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जनमित्र काम करत आहेत.या वसुली अभियानामध्ये निलंगा विभागातील शाखा कार्यालयांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. निलंगा विभागा अंतर्गत येणाऱ्या २२ गावांकडे असलेली थकबाकी व चालू महिन्याचे देयक असे एकत्रीत ३४ लाख ३१ हजार रूपयांची थकबाकी जमा करत थकबाकी शुन्य केल्याचा बहुमान मिळाला आहे.
घरगुती व व्यावसायिक वर्गवारीतील ३१८९ वीजग्राहकांकडील चालू देयकासह थकीत असलेल्या ३४ लाख ३१ हजार रूपयांची वसुली करण्यात यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे देय तारखेच्या आतच वसुलीची उदिष्टपुर्ती करण्यात आली आहे.
निलंगा विभागा अंतर्गत येणाऱ्या शिरूर अनंतपाळ तालूक्यातील दगडवाडी, हणमंतवाडी, सावरगाव तसेच औसा तालूक्यातील कुमठा, बाणेगाव, वाघोली, येळी, जावळी, देवांग्रा, मुगळेवाडी, अपचुंदा, गाढवेवाडी, हत्तरगा तर निलंगा तालूक्यातील सिगनाळ, चांदोरी, पिंपळवाडी, मालेगाव जेवरी, सांगवी, हणमंतवाडी, बोळेगाव, वाकसा, व चिंचोली(भ) या गावातील वीजग्राहकांनी आपले बील आपली जबाबदारी समजून वीजबील कोरे केले आहे.
वीजग्राहकांना वेळोवेळी दिलेली वीजसेवा व वेळेच्या आत केलेले तक्रारींचे निरसन यामुळेच थकबाकी वसुली शक्य झाल्याचा मनोदय थकबाकी शुन्य केलेल्या गावातील जनमीत्रांनी व्यक्त केला. वीजग्राहकांशी सुसंवाद ठेवला तर काहीही अशक्य नाही असे विचार कार्यकारी अभियंता संजय पोवार यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत व्यक्त केले.
फोटो ओळ :शाखा कार्यालय निलंगा ग्रामीण 2 अंतर्गत येणाऱ्या पिंपळवाडी, सांगवीवाडी, चिंचोली (भ), मालेगाव, सिगनाळ, आणि चांदोरीवाडी असे एकूण 6 गावातील चालू वीज बिलासहित थकबाकी मुक्त केल्या बद्दल मा. कार्यकारी अभियंता श्री संजय पोवार यांनी सर्व जनमित्रांचे कौतुक केले.

