
लातूर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती दिनांक 8 एप्रिल 2025 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत विविध उपक्रमांनी साजरी केली जाणार आहे.या उपक्रमाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक, संतोष पाटील, माझं घर प्रकल्पाचे प्रमुख
शरद झरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दगडू पडीले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमामध्ये ,देहदान,अवयवदान व्याख्यान,आरोग्य शिबिर,स्पर्धा सामाजिक,बौद्धिक, कार्यक्रमांचा आहे.युवक व बौद्ध नगर येथील सर्व महिला बालक पुरुष उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे रोहन इंगळे यांनी अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांचा या उपक्रमांमध्ये सहभाग वाढवून जयंती नाचून नाहीतर वाचून साजरी करण्याचा संकल्प डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचने केले असल्याचे सांगितले.

