भूसणी (ता. औसा) येथील जुन्या काळातील शेतीनिष्ठ, कष्टकरी शेतकरी प्रल्हाद ग्यानोबा मोरे (वय ८३) यांचे दुःखद निधन झाले.

दि. १३-०३-२०२५ रोजी शेतातून घरी जात असताना अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यामुळे मेंदूला इजा होऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल २८ दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर दि. १०-०४-२०२५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अंत्यविधी दि. ११-०४-२०२५ रोजी दुपारी ११:४५ वाजता भूसणी येथील त्यांच्या शेतामध्ये करण्यात आली.
त्यांच्या पश्चात मुले हिरालाल मोरे, संतराम मोरे, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.


