
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित “अजित पर्व युवा जोडो अभियान” अंतर्गत लातूर शहरात भव्य युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास युवकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमात युवकांशी थेट संवाद साधत युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी पक्षवाढीसाठी महत्त्वपूर्ण उपाययोजनांवर सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, आमदार विक्रम बप्पा काळे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच शहराध्यक्ष मकरंद भैय्या सावे, नांदेड शहराध्यक्ष जीवनजी घोगरे, प्रदेश सरचिटणीस ॲड. व्यंकटजी बेंद्रे, लातूर शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, युवक शहराध्यक्ष लाला सुरवसे, युवक प्रदेश उपाध्यक्ष इर्शाद सय्यद, युवक प्रदेश सरचिटणीस अमर पाटील, तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी विशाल आवाडे, अभिजित सगरे, प्रवीण पाटील आदींची उपस्थिती लाभली.मेळाव्यात युवकांनी पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, त्यांची क्षमता आणि नेतृत्वगुण विकासित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नेत्यांनी केले. युवकांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय योगदान द्यावे यावर भर देण्यात आला.या उपक्रमाच्या माध्यमातून नव्या युवकांची पक्षाशी बांधिलकी वाढवणे, त्यांना संघटनेशी जोडणे व पक्षाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लातूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. युवकांमधील सकारात्मक ऊर्जा आणि पक्षवाढीचा निर्धार यामुळे हा मेळावा विशेष यशस्वी ठरला.

