• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

हलणाऱ्या दिपमाळेसाठी प्रसिध्द असणारे रेणापूरचे श्री रेणूकामाता मंदिर

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
April 21, 2025
in Blog
0
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर,

-महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरे वेगवेगळया वैशिष्ट्यांमुळे प्रसिध्द आहेत. शिल्पकला,  वास्तूकला, भव्यता यासोबतच काही ना काही वेगळे वैशिष्ट्य सांगीतले जाते. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील श्री रेणूकामाता हे एक जागृत देवस्थान तर आहेतच परंतू येथील हलणारी दिपमाळ केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रसिध्द आहे. या मंदिराचे हे एक विलक्षण अनोखे वैशिष्ट्य आहे.

                         देवीच्या विविध रुपांमधील अनेक मंदिरे प्रसिध्द आहेत. देवीच्या साडेतीन शक्तीपिठासोबतच इतरही अनेक मंदिरे असून ते वेगवेगळया कारणांसाठी प्रसिध्द आहेत. लातूर जिल्ह्यातील लातूर पासून २० कि.मी. अंतरावर असणाऱ्या रेणापूर येथील श्री रेणूकामाता मंदिरही असेच अतिशय प्राचिन मंदिर आहे. पुण्यश्लोक  अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केलेला आहे. या मंदिराच्या स्थापनेची लोकवंदता म्हणजे गावातील एका बारवेत श्री रेणूकामातेची मुर्ती सापडली असे सांगीतले जाते. त्यांनतर सध्याच्या मंदिरामध्येही मुर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. चालुक्यकालीन हे मंदिर आहे. जमदग्नी ऋषींचा आश्रम या भागात होता असेही म्हटले जाते. मात्र या संदर्भात काही संशोधन झाल्याचे दिसून येत नाही.

                      लातूर जिल्यातील नागरिकांसाठी श्री रेणूकामाता ही नवसाला पावणारी आणि जागृत आहे. नवरात्रीमध्ये या ठिकाणी मोठा उत्सव साजरा करण्यात येत असतो. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. विविध धार्मिक कार्यक्रम या काळात घेण्यात येतात. दसऱ्याच्या दिवशी सिमोलंघनासाठी देवीची पालखी निघते.  या दिवशी मोठी यात्रा भरवण्यात येत असते. मागील कांही वर्षांपासून या मंदिरात दर्शनासाठी पायी येणाऱ्या भक्तांची संख्या वाढलेली आहे. लातूर शहरातून तसेच आजूबाजूच्या परिसरातून नागरिक पायी रेणूकामातेच्या दर्शनासाठी येत असल्याचे दिसून येते. पुर्वाभिमुख असणारे ही मंदिर आहे. महाद्वार मनमोहक आणि सुरेख दिसेल असे नंतर बांधलेले आहे. या महाद्वारामधून पुढे आले की सर्वप्रथम दिसते ते दिपमाळ आणि दिवा लावण्यासाठीची दगडी बांधकाम केलेली दिपमाळ

अनोखी हलणारी दिपमाळ* 

 *

श्री रेणूकामातेच्या मंदिरासमोर बांधकाम केलेली दिपमाळ आहे. सुमारे ३५ फुट उंचीची ही दिपमाळ विट आणि चुन्यामध्ये भरीव अशी बांधण्यात आलेली आहे. दिपमाळेच्या वरच्या बाजूस जाऊन ती हलवण्यात आली तर बुडापासून ही दिपमाळ हलते. बांधकामाचे हे नेमके तंत्रज्ञान काय आहे याचा उलगडा मात्र आजही कोणाला झालेला  नाही. या मंदिराच्या जवळ एक बारव होती परंतू ती बुजवण्यात आलेली आहे.

अभय मिरजकर

9923001824

Previous Post

माध्यमिक शिक्षण विभागातील अनियमितता — लातूरचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी वादाच्या भोवऱ्यात!

Next Post

नाट्यकलेतील खाटीक समाजाचा धगधगता दीपस्तंभ : भारत थोरात गुरुजी

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

नाट्यकलेतील खाटीक समाजाचा धगधगता दीपस्तंभ : भारत थोरात गुरुजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved