
लातूर दि.२१(प्रतिनिधी)- सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.देविदासराव रामराव कुलकर्णी चाकूरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यू समयी ते ७५ वर्षाचे होते.
चाकूर येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. देविदासराव रामराव कुलकर्णी हे माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले झाले होते. प्राचार्य म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. एम.एस्सी.एम.एड. एम. फील. पिएचडी. त्यांनी मिळवलेली होती. तब्बल चार विषयांमध्ये त्यांनी उच्च पदवी घेतली होती. दोन विद्यापीठात डीन म्हणून त्यांनी काम केले होते. मराठी साहित्य संमेलनामध्ये अनेक पुस्तकांचे त्यांनी सादरीकरण केले होते. विनोदी शैलीमुळे त्यांना हास्य सम्राट म्हणून ओळखले जात होते. पीएचडीचे गाईड म्हणून सुद्धा ते कार्यरत होते.
मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, दोन भाऊ , एक बहिण असा मोठा परिवार आहे
