• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

पिंपळनेरमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचा नंदादीप; माणुसकीच्या नात्याने उजळली मलिक साहेब यात्रा

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
April 22, 2025
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर गावाने पुन्हा एकदा धर्म, जात आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा झेंडा उंचावला आहे. गेल्या २०० वर्षांपासून साजरी केली जाणारी मलिक साहेब यात्रेची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे या यात्रेत हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन भाईचाऱ्याचे, ऐक्याचे आणि सौहार्दाचे अप्रतिम दर्शन घडवतात.

यात्रेच्या सुरुवातीला पैठण येथून कावड यात्रा घेऊन आलेले भाविक गावातून ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणूक काढतात. भगवा आणि हिरवा झेंडा एकत्र फडकावत, मलिक साहेब, संत वामनभाऊ महाराज, संत भगवान बाबा आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकावर एकाच कलशातील पाण्याने जलाभिषेक केला जातो. ही महाराष्ट्रातील एकमेव आणि प्रेरणादायी परंपरा पिंपळनेरमध्ये आजही जपली जाते.

या यात्रेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, हिंदू-मुस्लिम महिला एकमेकींना पेढे भरवून, गळाभेट घेत माणुसकीचे दर्शन घडवतात. गावात कोणतीही जात, धर्म किंवा भेदभाव न करता सर्वजण एकत्र येऊन यात्रा साजरी करतात. पारंपरिक लेझीम पथकात दोन्ही समाजातील तरुण मोठ्या आनंदाने सहभागी होतात.

मलिक साहेब यांच्या दर्ग्यावर जलाभिषेक करून, चादर अर्पण करत यात्रेला सुरुवात होते. यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक पिंपळनेरमध्ये दाखल होतात, आणि गावातले हे सामंजस्य आणि ऐक्य पाहून प्रत्येकाच्या मनात समाधान आणि आश्चर्याचे भाव उमटतात.

पिंपळनेर हे गाव केवळ धार्मिक यात्रेसाठीच नव्हे, तर माणुसकी, एकोपा आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरले आहे.


Previous Post

सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ.देविदासराव रामराव कुलकर्णी चाकूरकर यांचे निधन*

Next Post

सुनंदा कोळगे वटवृक्षासारख्या समर्थ, संस्कारक्षम व्यक्तिमत्त्वाला हार्दिक शुभेच्छा!

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

सुनंदा कोळगे वटवृक्षासारख्या समर्थ, संस्कारक्षम व्यक्तिमत्त्वाला हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1
लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

May 10, 2026
ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

May 10, 2026
बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

May 10, 2026
नारी हीच नारायणी : दर्जी बोरगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात

नारी हीच नारायणी : दर्जी बोरगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात

May 10, 2026

Recent News

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

May 10, 2026
ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

May 10, 2026
बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

May 10, 2026
नारी हीच नारायणी : दर्जी बोरगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात

नारी हीच नारायणी : दर्जी बोरगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात

May 10, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

May 10, 2026
ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

May 10, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved