
upsc civil सर्विसेस २०२४ चा निकाल आज जाहीर करण्यात आला त्यात आंबेडकरवादी मिशन चे अतुल राजूरकर AIR ७२७ व आनंद सदावर्ते AIR ९४५ यांची अंतिम यादीत निवड झाली.

अतुल चे वडील बीएसएनएल मधे डेलिव्हेजस कर्मचारी होते त्यांनी विपरीत आर्थिक परिस्थितीत मुलांचे शिक्षण पूर्ण केले.दिल्ली येथे गेल्या एक वर्षा पासून मिशन तर्फे पूर्ण सहकार्य करून यूपीएससी तयारी साठी मदत देण्यात आली.गेल्या वर्षी पण अतुल मुलाखती पर्यंत गेला होता पण या वर्षी त्याची अंतिम निवड करण्यात झाली.
आनंद सदावर्ते हे श्रीनगर जम्मू येथे ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ एग्रिकल्ट्रल रिसर्च मधे प्रश्सकीय अधिकारी मनून कार्यरत आहे हा त्याच दुसरा इंटरव्यू यात त्याची निवड झाली
आंबेडकरवादी मिशन येथे विद्यार्थ्यांना दिल्ली च्या नामवंत next ias चे क्लास ची सुविधा निःशुल्क दिल्या जातात,पूर्व परीक्षा पास गरीब विद्यार्थ्यांना दिल्ली येथे निशुल्क एक वर्षासाठी निवाशी जेवण हॉस्टल अभ्यासिक मार्गदर्शन सर्व सुविधा निःशुल्क पुरवल्या जातात याच लाभ गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी घ्यावा सर्व जाती धर्मातील गरीब विद्यार्थ्यां साठी या सुविधा देणारे महाराष्ट्रातील आंबेडकरवादी मिशन एकमात्र सामाजिक केंद्र आहे असे याप्रसंगी दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी स्पष्ट केले

