उदगीर
उदगीर तालुक्यातील मौजे करडखेल पाटी येथे कार आणि ट्रकच्या अपघातात तीन जण ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे.

एम एच 24 V 0163 या क्रमांकाची कार लातूरकडे जात होती . करडखेल पाटीवरती लातूरहून उदगीर कडे येत असलेला ट्रक क्रमांक एपी 39 टी 36 86 यांचाअपघात झाला . या भीषण अपघातात कार मधील तिघेजण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये यादव तुळशीराम काळे राहणार सुगाव तालुका शिरुर अनंतपाळ जिल्हा लातूर , विठ्ठल बाबुराव येचवाड, बब्रुवान मारुती मेकले हे जागीच ठार झाले तर हुजूर दुर्लखान पठाण हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
