एमआयडीसी पोलीसांची कार्यवाही.

लातूर दि. चोरलेले मोबाईल विक्रीसाठी फिरणाऱ्या दोघा युवकांना पोलीसांनी ताब्यात घेतले. तब्बल 16 चोरीचे मोबाईल त्यांच्या कडून जप्त करण्यात आले आहेत.
या संदर्भात अधिक माहिती अशी की,
दिनांक 22/04/2025 रोजी पोलीस ठाणे एमआयडीसी च्या गुन्हे प्रकटन शाखेने, चोरलेले मोबाईलची विक्री करण्यासाठी फिरत असताना कीर्ती चौक परिसरातून दोघांना ताब्यात घेतले .त्यांचे जवळील त्या बँगेमध्ये काही मोबाईल असल्याचे दिसले त्यास सदर मोबाईलबाबत विचारपुस केली असता समाधानकारक उत्तरे देत नव्हते . बॅगेतील मोबाईल लातुर शहरातील वेगवेगळया ठिकाणाहुन चोरले असल्याचे कबुल केले. ओम मुरलीधर सुर्यवंशी, वय 19 वर्षे रा. हाडको कॉलनी लातुर. सतीष नरसींग माने, वय 22 वर्षे रा. हाडको कॉलनी . या दोघांना गुरनं. 321/2025 कलम 303 (2) बीएनएस प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात चोरी गेलेला माबाईल असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयामध्ये अटक करण्यात आली . त्यांचे ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीचे एकुण 16 मोबाईल किंमत अंदाज 1,16,000/-रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस अंमलदार गोविंद चामे हे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक प्रशांतसिंग राजपुत, सफौ बेल्लाळे, शिंगाडे पोलीस अमलदार मुळे, भोसले, मस्के, ओगले, सोनकांबळे यांनी केली आहे.

