
लातूर : श्री श्री रविशंकर माध्यमिक विद्यालय, लातूर यांनी यंदाही शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. कु. राजनंदिनी हंसराज पाटील हिने १००% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. कु. वैभवी विवेकानंद स्वामी हिने ९९.४०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर कु. श्रावणी बळवंत काकडे, कु. गौरी अरुण गायकवाड व चि. शौर्य रमेश शिंदे यांनी ९८.८०% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
या परीक्षेत एकूण ९९ विद्यार्थ्यांपैकी ३७ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक, ३६ विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा अधिक आणि २६ विद्यार्थ्यांनी ७०% पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तुंग यश प्राप्त केले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे विद्यालयाचे संचालक श्री. राजेंद्र कोळगे सर, सर्व संचालक मंडळ, कार्यालयीन व्यवस्थापक श्री. आशिष कोळगे सर, मुख्याध्यापिका सौ. सोनाली कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका सौ. सुलभा जोशी, तसेच सर्व शिक्षकवृंदांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
– प्रतिनिधी

