• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

लातूरच्या पर्यावरण व पशुवैद्यकीय समस्यांवर तातडीने कार्यवाहीचे संकेत

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
June 11, 2025
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे यांची घेतली भेट


लातूर शहर आणि परिसरातील वाढत्या पर्यावरणीय समस्यांसह पशुवैद्यकीय सुविधांच्या अभावावर तातडीने कार्यवाही व्हावी, या मागणीसाठी आज मंत्रालय, मुंबई येथे सामाजिक कार्यकर्त्या व पशुवैद्यकीय क्षेत्रातील जाणकार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरण बदल आणि पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान लातूरमधील दोन अत्यंत महत्त्वाच्या व गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली आणि संबंधित निवेदन मा. मंत्र्यांना सादर करण्यात आले.


लातूर MIDC परिसरातील दूषित पाण्याचा प्रश्न

डॉ. पाटील यांनी निदर्शनास आणून दिले की, मौजे हरंगुळ (बु.) येथील मंदार वस्ती आणि वरवंटी (बसवंतपूर) येथे लातूर औद्योगिक वसाहतीतून (MIDC) मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त दूषित पाणी नाल्याद्वारे थेट रहिवासी वस्तीत शिरत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत आहे.

या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करावी आणि दूषित पाण्याच्या विल्हेवाटीकरिता यंत्रणा विकसित करावी, अशी मागणी त्यांनी केली.


लातूर जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयातील अडचणी

लातूर येथील पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयात सध्या विविध मूलभूत सुविधा नाहीत आणि अनेक पदे रिक्त असल्यामुळे शेतकरी व पशुपालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. अर्चनाताईंनी पुढील मुद्द्यांचा ठामपणे मागोवा घेतला:

  • बंद असलेले IPD विभाग तातडीने सुरू करावा.
  • जून २०२३ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या अद्ययावत पशुरोग निदान प्रयोगशाळेचे काम त्वरीत सुरू करावे व निधी वितरित करावा.
  • इमर्जन्सी वॉर्डची निर्मिती करावी, जेणेकरून अपघातग्रस्त जनावरांवर त्वरित उपचार होऊ शकतील.
  • शिपाई व खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी.
  • निवासी वैद्यकीय अधिकारी पदे तातडीने भरली जावीत.
  • थ्री-फेज वीज कनेक्शन नसल्यामुळे बंद असलेले सोनोग्राफी यंत्र त्वरित कार्यान्वित करावे.
  • Blood Biochemistry तपासण्या (LFT, KFT) दवाखान्यात उपलब्ध करून द्याव्यात.

या सर्व मागण्यांवर मा. पंकजाताई मुंडे यांनी संपूर्ण गांभीर्याने लक्ष दिले व लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचे डॉक्टर अर्चनाताईंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

लातूरसारख्या ग्रामीण जिल्ह्यात शाश्वत पर्यावरणीय धोरण आणि पशुवैद्यकीय व्यवस्थेचा बळकटीकरण होणे गरजेचे असून, यासाठी अशा प्रयत्नांना धोरणात्मक पातळीवर समर्थन मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत सामाजिक क्षेत्रात या भेटीबद्दल व्यक्त होत आहे.


Previous Post

अन्न सुरक्षित असेल तर आरोग्य निश्चित असेल-प्रा. 

Next Post

शैलेश गायकवाड मुंबई विद्यापीठात एमबीए मध्ये सर्वप्रथम

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

शैलेश गायकवाड मुंबई विद्यापीठात एमबीए मध्ये सर्वप्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved