आधुनिक कृषि तंत्रज्ञान आणि खरीप हंगाम पूर्व नियोजन प्रसारासाठी विकसित कृषी संकल्प अभियान

दि. २९ मे ते १२ जून २०२५ या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पोहोचवण्याचे काम महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, राष्ट्रीय भरड धान्य संशोधन संस्था, सोलापूर यांच्यामार्फत केले जात आहे.
आज पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील शेतकऱ्यांची संवाद साधताना अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विषयाचे विषय विशेषज्ञ प्रा. दिनेश क्षिरसागर यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्ताने अन्न सुरक्षा बद्दल माहिती देताना अन्न सुरक्षित असेल तर आरोग्य निश्चित असेल असे प्रतिपादन केले. तसेच पॅकेज फूड खरेदी करत असताना त्यावरील पोषक तत्वांची माहिती घेऊनच खरेदी करावे असे नमूद केले.

डॉ. परशुराम पात्रोटी, वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय भरड धान्य संशोधन संस्था, सोलापूर यांनी शेतकऱ्यांना भरडधान्यामध्ये राळा या पिकाचे बियाणे पेरणीसाठी दिले आणि शेतकऱ्यांनी इतर पिकांबरोबरच काही प्रमाणामध्ये भरडधान्याचाही उत्पादन घ्यावे याबद्दल तांत्रिक सल्ला दिला.
डॉ. शिल्पा परशुराम यांनी डाळिंब पिकातील तेल्या रोग व डाळिंबामध्ये येणारा मर रोग याबद्दल मार्गदर्शन केले. पीक संरक्षण विषयाचे विषय विशेषज्ञ डॉ. पंकज मडावी यांनी उसावरील कीड व रोग व्यवस्थापन बद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. माती व पाणी परीक्षण आधारित खत व्यवस्थापन याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मृद विज्ञान व कृषि रसायन शास्त्रं विषयाचे विषय विशेषज्ञ श्रीमती काजल जाधव म्हात्रे यांनी माहिती दिली याबद्दल मार्गदर्शन दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष भोसे गावचे सरपंच श्री. गणेश पांडुरंग पाटील यांनी विकसित संकल्प अभियानाचे कौतुक करून कृषि संशोधन आणि उपक्रम शेतकरी अभिमुख व्हावे असे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकारी, श्री सुहास यादव, उप- कृषी अधिकारी श्री. रामचंद्र कचरे व श्री आनंद ढवळे आणि श्री.योगेश पवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक कृषि अधिकारी, डी. जी. खोत आणि सुयोग ठाकरे, कार्यक्रम सहायक (संगणक) उपस्थित होते.

