
महा. अंनिसच्या जिल्हा बैठकीनंतर जाहीर कार्यक्रमात समाजवादी विचारवंत रंगा राचुरे यांचे प्रतिपादन.
लातूर दि. २२ मुठभर श्रीमंत आणि उच्चवर्णीय लोकांच्या हातातील स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधी यांनी जनमानसाच्या हातात दिला आणि जनमानसाला नायक बनवले म्हणून महात्मा गांधींना धर्मांध लोक विरोध करत आहेत, त्यांच्याबद्दल वेगवेगळे गैरसमज समाजामध्ये पसरवून लोकांच्या आणि तरुणांच्या मनात गांधी बद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लातूर च्या वतीने हॉटेल अंजनी येथे आयोजित सत्कार व जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना रंगा राचूरे म्हणाले की, गांधीजी प्रमाणेच नेहरू बद्दलही असेच अनेक गैरसमज समाजामध्ये पसरवले जात आहेत. गांधीजींनी धर्माला केव्हाही सोडले नाही, धर्माची शेपटी हातात पकडूनच संबंधित मार्गानेच स्वातंत्र्य लढ्यात मार्गक्रमण केले. त्यामुळे धर्मांध शक्तींना गांधीजींच्या विरोधात लढा उभा करणे अवघड जात होते म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक महात्मा गांधी – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी- भगतसिंग, महात्मा गांधी- सुभाष चंद्र बोस असे अनेक कृत्रिम वाद निर्माण केले. यावर लोकांनी विश्वास न ठेवता मूळ संदर्भ पुस्तके वाचावेत रेफरन्स तपासावेत, व्हाट्सअप युनिव्हर्सिटीवर कोणीही विश्वास ठेवू नये. गांधीजी एका खादीच्या पंचावर गोलमेज परिषदेला कडाक्याच्या थंडीत इंग्लंडला गेले, म्हणून आज धर्मांध लोक खादीचा अपमान करतात, तो केवळ खादीचा अपमान नसून संपूर्ण देशाच्या अस्मितेचा अपमान आहे. असे अगदी संदर्भासह परखड विचार त्यांनी मांडले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हा शाखा लातूर व शहर शाखा लातूर च्या वतीने सकाळी साडेदहा ते पाच च्या दरम्यान जिल्हा कार्यकारणी बैठक व शहादा जिल्हा नंदुरबार येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीत राज्य कार्यकारिणीवर निवड झालेल्या लातूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ आणि जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी वसंतराव काळे महाविद्यालय ढोकी ता. जि. धाराशिव येथील प्राचार्य डॉ हरिदास फेरे होते त्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, समाजामध्ये अंधश्रद्धा या अज्ञानावर, अगतिकतेवर आधारित असतात, त्यामुळे समाजातील अज्ञान दूर करणे महत्त्वाचे आहे. सत्ता बदलली की लोक बदलतात, सत्ते सोबत झुकणाऱ्या माणसांची संख्या खूप आहे, परंतु जी माणस कुठल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता केवळ कर्तव्य भावनेने काम करीत सत्याची त्यागाची भाषा करतात तेच इतिहास घडवतात असे प्रतिपादन ही त्यांनी केले. यावेळी विचारपीठावर नारी प्रबोधन मंच लातूरच्या अध्यक्ष मा. सुमती जगताप, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार अभ्यासक मा. विश्वास मोमले, महा.अंनिस लातूर शहर शाखेचे अध्यक्ष मा. बब्रुवान गोमसाळे , बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आदिनाथ सांगवे साहेब, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष मा.माधव बावगे , दिलीप आरळीकर, सुनिता आरळीकर, अजित निंबाळकर सह सत्कारमूर्ती ची ही उपस्थिती होती.
प्रारंभी प्रस्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ.दशरथ भिसे यांनी मांडले, प्रास्ताविकामध्ये त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यावेळी लातूर जिल्ह्यातून राज्य कार्यकारिणीवर राज्याध्यक्ष म्हणून माधव बावगे, राज्यप्रधान सचिव रुकसाना मुल्ला, राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार, विविध उपक्रम राज्य कार्यवाह अनिल दरेकर, विद्वान बोध वाहिनी विभागाचे राज्य सहकार्यवाह बाबा हलकुडे, मिश्र व सत्यशोधकी विवाह राज्य कार्यवाह पाडवा रणजीत आचार्य यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला,
तसेच लातूर शहर व उदगीर शाखांना लक्षवेधी शाखा पुरस्कार मिळाल्याबद्दल व लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त माधव बावगे, इम्रान सय्यद, अनिल दरेकर,बाबुराव माशाळकर, प्रा.डॉ. दशरथ भिसे, प्रा. डॉ.बळीराम भुक्तरे यांचाही पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुमती जगताप, विश्वास मोमले, माधव बावगे, सुनिताताई आरळीकर,बब्रुवान गोमसाळे, गुरुनाथ सांगवे, रूकसाना मुल्ला, उत्तरेश्वर बिराजदार यांनी थोडक्यात आपली मनोगते मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रधानसचिव प्रा. डॉ. बळीराम भुक्तरे, जिल्हा कार्यवाह हनुमंत मुंडे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रधानसचिव सुधीर भोसले यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर कार्याध्यक्ष डॉ. गणेश गोमारे, गंगाधर गवळी, सचिन औरंगे, बाळासाहेब जगताप यांनी परिश्रम घेतले.या जिल्हा बैठकीला जिल्ह्यातील अकरा शाखांचे पदाधिकारी किसनराव सोनटक्के, मारुती घोटरे, प्रताप माने पाटील, प्रा. दत्ता सोमवंशी, प्रा. अशोक नारनवरे, शिवाजीराव साखरे, अनिता भोसले, मंगलताई बावगे, ललिता दरेकर, शिरीष रोडगे, प्राचार्य विजयकुमार पाटील, उमाकांत किडिले, ज्योती ढगे, विनोद डाके, देवराज लंगोटे, एड. संतोष गंभीरे, मधुकर कांबळे, अनंतवाड पी.एस., श्याम सुरवसे, संजय गड्डीमे, विठ्ठल कांबळे, श्रवणकुमार चिद्री, प्रतिमा गवळी, प्रतिभा गवळी, एड. सुरेश सलगरे, विद्या हातोलकर, विशाखा भोसले, शकुंतला ढगे, तलवारे यु. एम., आर्यवीर आचार्य यांचेसह १५० कार्यकर्ते उपस्थित होते.

