
लातूर दि.२०- लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या प्रांगणात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते व इतर अनेक महायुतीतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि २६ जुलै २०२५ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे नेते आ. श्री. रमेशआप्पा कराड यांनी दिली.
महाराष्ट्राचे लोकनेते केंद्रीय ग्रामविकास माजीमंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पूर्णकृती पुतळा लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालय इमारत परिसरात उभारण्यात आला असून शासकीय जागेत मुंडे साहेबांचा लातूर येथे बसवण्यात आलेला पुतळा कदाचित राज्यातील पहिलाच असेल अशी माहिती देऊन भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड म्हणाली की, भव्य दिव्य उभारण्यात आलेल्या या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण येत्या २६ जुलै २०२५ शनिवार रोजी सकाळी १० वाजता राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या अनावरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले हे राहणार आहेत. तर याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे, सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील, माजी कृषीमंत्री आ. धनंजयजी मुंडे, माजी युवक कल्याण व क्रिडामंत्री आ. संजय बनसोडे, माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, औश्याचे आमदार अभिमन्यू पवार, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष गोविंदअण्णा केंद्रे, भाजपा नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर, शिवसेना संपर्कप्रमुख अँड बळवंतराव जाधव, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, रिपाई जिलाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास जिल्हाभरातील भाजपासह महायुतीतील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व संबंधितांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी केले आहे

