• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

शुद्ध पैदासीतून देशी गोवंशाला शाश्वत व्यवसायाकडे घेऊन जाणे गरजेचे – प्रा. डॉ. इंद्रमणि, कुलगुरू

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
July 23, 2025
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


लातूर : शुद्ध पैदासीतून देशी गोवंशाला शाश्वत व्यवसायाकडे घेऊन जाणे गरजेचे असून शुद्ध गोवंश पैदासीतून गुणात्मक व संख्यात्मक गोमातेचा विकास शक्य होईल असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इंद्रमणी याने केले . ते कृषि महाविद्यालय, लातूर, विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर, एम.एस.डी. पशु आरोग्य,लातूर, देवणी गोवंश जतन व पैदासकार असोसिएशन, लातूर आणि ज्येष्ठ पशुवैद्यक संघ,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.22 जुलै 2025 रोजी आयोजीत शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन सप्ताह समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कार्यक्रमास माफसु चे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ अनिल भिकाने , वनामकृवीचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार , सहयोगी अधिष्ठता डॉ.बाबासाहेब ठोंबरे, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ.नानासाहेब सोनवणे, डॉ. अच्युत भरोसे,डॉ.भास्कर बोरगावकर, राजेशजी संन्याशी, डॉ.चंद्रशेखर दैवज्ञ व कुणाल घुंगार्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात डॉ. भिकाने म्हणाले की स्थानिक देवणी व लाल कंधारी गोवंश जतन व संवर्धन करणेसाठी उत्कृष्ट निवड प्रक्रिया, सेक्स सॉर्टेड सिमेन व आय व्ही एफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गायीची दूध उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. पैदासकारानी गोवंशाची पैदास वळूकेंद्रित न ठेवता गायकेंद्रित करणे गरजेचे असून धोरणकर्ते, शास्त्रज्ञ व पैदासकार यांनी समन्वयातून गोवंशाचा समतोल विकास साधावा. देशी गोवंशाच्या वाढीसाठी उत्कृष्ट चारा उत्पादन,आहार व्यवस्थापन व मुक्तसंचार गोठ्याचा अवलंबं करावा.


डॉ. आसेवार यांनी देशी गोवंश जतन व संवर्धनाचे महत्त्व विशद करून मार्गदर्शन केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ.ठोंबरे म्हणाले की शुद्ध पैदास,समतोल आहार, काटेकोर व्यवस्थापन आणि चांगले आरोग्य हे पशुधन गुणवत्तेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ते पुढे असेही म्हणाले की दुग्ध उत्पादन, सेंद्रिय खत व शेतीसाठी ओढ शक्ती हे शुद्ध देशी गोवंशाच्या संवर्धनातून होऊ शकते. याप्रसंगी डॉ. बोरगावकर, श्री संन्याशी व डॉ. सोनवणे यांनी देखील मनोगत व्यक्त केले या प्रसंगी डॉ.अनिल भिकाणे, बच्चेसाहेब देशमुख, रावसाहेब आडे यांचा सेवापुर्ती निमित्त गौरव करण्यात आला. तसेच देशी गोवंश शास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. श्रीधर शिंदे, डॉ.अनंत शिंदे,डॉ. गणेश निटुरे , देवणी व लाल कंधारी गो पैदासकार शेषराव सूर्यवंशी, देविदास नरवटे, सत्यभामा शिंदे, रज्जाक पठाण, विठ्ठल देवकते व बालासाहेब जाधव यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अच्युत भरोसे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. अनंत शिंदे व आभार कुणाल घुंगार्डे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. व्यंकट जगताप,डॉ.विजय भामरे, डॉ. ज्योती देशमुख, डॉ. राजेश शेळके, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. पद्माकर वाडीकर, डॉ.सुनिता मगर, डॉ. दयानंद मोरे, डॉ. प्रभाकर आडसूळ,डॉ.नितीन तांबोळी,डॉ. अनिल कुमार कांबळे,डॉ.ज्ञानेश्वर सुरडकर, डॉ. महेंद्र दुधारे, डॉ. रमेश ढवळे,डॉ. योगेश भगत,प्रा.ममता पतंगे यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला लातूर धाराशिव नांदेड व बीड या चार जिल्ह्यातील पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Previous Post

महाराष्ट्रातील वनांमध्ये १६११९ आगीच्या घटनांची नोंद सर्वाधिक आगीच्या घटनांची वाढ गडचिरोली जिल्ह्यात

Next Post

विध्यार्थ्यानी आपल्या विध्यार्थी दशेत विद्या प्राप्त करण्यासाठी कसून अभ्यास करावा, प्रा,अनंत लांडगे

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

विध्यार्थ्यानी आपल्या विध्यार्थी दशेत विद्या प्राप्त करण्यासाठी कसून अभ्यास करावा, प्रा,अनंत लांडगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved