
संग्रहित छायाचित्र … छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक दौलताबाद किल्ला परिसरात लागलेल्या वणव्याचे छायाचित्र
लातूर दि. २२. (अभय मिरजकर)-
महाराष्ट्रामध्ये असलेल्या वनांमध्ये विविध कारणांनी आग लागण्याच्या घटना घडत असतात . सन २०२३-२४ या वर्षात राज्यात एकूण १६००८ आगीच्या घटनांची नोंद झालेली आहे. सर्वाधिक आगीच्या घटनांची वाढ ही राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात झालेली असून मागील वर्षापेक्षा 2023 24 मध्ये तब्बल 949 आगीच्या घटना वाढलेले असल्याचे दिसून येते. आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी जनजागृती आवश्यक असून नागरिकांचे प्रबोधन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वनांमध्ये आग लागण्याची प्रमुख दोन कारणे आहेत त्यामध्ये एक नैसर्गिक तर एक मानवनिर्मित. वीज पडणे, उष्णता अधिक वाढल्याने लागलेली आहे नैसर्गिक स्वरूपात मोडते. परंतु मानवनिर्मित आगीच्या घटनांमध्ये पावसाळ्यात चांगले गवत मिळावे यासाठी उन्हाळ्यात आग लावण्याचे प्रकार करण्यात येतात. वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी किंवा त्यांना सापळ्यात ओढण्यासाठी आगी लावल्या जातात. तसेच हे गुन्हे लपविण्यासाठी व पुरावा नष्ट करण्यासाठी आगी लावल्या जातात. बिडी अथवा सिगारेटची जळती थोडके टाकल्यामुळे आग लागते. जंगलात अन्न शिजवून खाल्ल्यानंतर अग्नी न भिजवल्यामुळे आग लागून त्याचे वनव्यात रुपांतर होते. काही वेळा वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी म्हणून आगी लावल्या जातात.
महाराष्ट्र मध्ये सन 2022-2023 आणि 2023- 2024 या दोन वर्षातील वनांमधील आगीच्या घटना कडे पाहिल्यानंतर राज्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ न होता घट झाल्याचे दिसून येते. परंतू ही घट वरवरची दिसून येते. ज्या भावात जंगल अधिक आहे त्या ठिकाणी आगीच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही खऱ्या अर्थाने चिंतेचे कारण आहे. 2022 – 23 मध्ये राज्यात 16,119 आगीच्या घटना घडलेल्या होत्या तर 2023 – 24 मध्ये 16008 घटना घडलेल्या आहेत. सर्वाधिक आगीच्या घटना गडचिरोली जिल्ह्यात वाढलेल्या दिसून येतात. ही वाढ तब्बल 949 ने अधिक आहे.
राज्यात सन 2023-2024 मध्ये जिल्हानिहाय वनामध्ये लागलेल्या आगींची संख्या पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी ही 2022 – 23 मध्ये लागलेल्या आगीची आहे. अहिल्यानगर २५५ (२७३), अकोला १७ (४४), अमरावती १५२ (४८२), छत्रपती संभाजी नगर ९२ (८५), बीड १९ (४८), भंडारा १४७ (९३), बुलढाणा ३६(१३०),चंद्रपूर ९६५ (१२४६), धुळे १४८ (१६५), गडचिरोली ७०४२ (६०९३), गोंदिया ६४४ (६०५), हिंगोली २१ (२६) , जळगाव २०७ (४१३), जालना ४ (१३), कोल्हापूर ५२३ (६१८), लातूर २ (९), मुंबई शहर १(०), मुंबई ग्रामीण ३१ (४८), नागपूर २५५ (२३८), नांदेड १७९ (३६१), नंदुरबार १८३ (१०९), नाशिक ५४२ (४१४), धाराशिव ५ (१०), पालघर ३३१ (३७१), परभणी ४ (५), पुणे ९११ (७५९), रायगड ११२८ (१००५), रत्नागिरी १९ (७), सांगली ८३ (१५८), सातारा ६२१ (५७४), सिंधुदुर्ग ९७ (२७५), सोलापूर ४२ (५८ ) ठाणे ७१७ (७२५), वर्धा १४१ (१२०), वाशिम ३२ (८२), यवतमाळ ४१२ (४६७).
वनांमधिल आगीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी लोकांना जागृत करणे आवश्यक आहे. जंगलामध्ये बिडी सिगारेट ओढण्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. तसेच अन्न शिजवण्यास बंदी घातलेली पाहिजे. वनातील लागणाऱ्या अथवा लावला जाणाऱ्या आगींवर नियंत्रण आले तरच वन्यजीव, पशू-पक्षी यांचे संवर्धन होईल.

