
, लातूर दिनांक, 23,07,2025, विद्यार्थ्यांचे विधेवर जास्त प्रेम असले पाहिजे तरच त्याला विद्या प्राप्त करण्याची गोडी लागते, उदात्त ध्येय समोर ठेऊन विध्यार्थ्यानी वाचन मनन केले पाहिजे, वाचणाने माणसाच्या विचारांची उंची वाढते म्हणून ज्ञान मिळविण्याचा महत्वाचा मार्ग म्हणजे वाचन व अभ्यास तेव्हा विध्यार्थ्यानी आपल्या विद्यार्थी दशेत विद्या प्राप्त करण्यासाठी कसून अभ्यास करावा असे प्रतिपादन किनगाव येथील वसंतराव नाईक आश्रम शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते तथा मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघांचे राज्य अध्यक्ष प्रा, अनंतराव लांडगे यांनी केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गुळवे हे होते तर संस्थेचे कार्याध्यक्ष हेमंत गुळवे हेही उपसस्थित होते, या प्रसंगी प्राचार्य बाळासाहेब झरीकर, आर, पी, आय, नेते प्रचार्य विजय श्रँगारे यांनी ही आपले विचार मांडले, पुढे बोलताना प्रा लांडगे म्हणाले कि कालकथित डॉ, अंबादास गुळवे साहेब यांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारून ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी ही आश्रम शाळा काढलेली आहे, हे त्यांच्या कष्टाचं फळ आहे, तेव्हा शिक्षकांनी पण या गोर गरीब विध्यार्थ्यांना तळमळीने शिक्षण देऊन त्यांचे आयुष्य घडवावे, शाळेची इमारत भव्य असून येथील शिक्षक ही तळमळीने शिकवीन्याचे कार्य करीत आहेत, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी, व्ही, मडके यांनी केले तर आभार वंजे यांनी मानले, या कार्यक्रमाला शिक्षक व विध्यार्थी उपसस्थित होते, मा, संपादक साहेब, वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करावी ही विनंती, प्रा, अनंत लांडगे,

