
औसा तालुक्यातील नागरसोगा येथे राजकुमार शेषराव अडसुळे या 45 वर्षीय व्यक्तीचा स्वतःच्या शेताजवळील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पवन चक्कीसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दुर्दैव मृत्यू झाला.
मंगळवारी सायंकाळी ते शेतावरून आले नाही. म्हणून त्याची शोधाशोध केली जात होती. मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती मंगळवारी दिवसभरात दोन वेळा ढगफुटी सदस्य पाऊस नागरसोगा व परिसरात सुरू होता. या पावसातही त्याचा शोध घेण्यासाठी शेतात गेल्यानंतर शेतातील बंधाऱ्यावर त्याची मोटारसायकल आणि डिक्कीमध्ये मोबाईल व मोटार सायकल शेजारी त्याच्या पायातील चपला सापडल्या होत्या. पाऊस आणि अंधारात हि त्याचा शोध घेतला पण तो कुठेच मिळून आला नाही. बुधवारी दिवस भरही त्याचे कुटुंबीय व अन्य सहकारी त्याचा शोध घेत होते. पण तो कुठेच मिळून आला नाही. अखेर गुरुवारी सकाळी मात्र पवनचक्की साठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये त्याचा मृतदेह तरंगताना दिसून आला. याबाबत औसा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. औसा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून औश्याचे पोलीस निरीक्षक रेवानात ढमाळे नागरसोगा बीट चे बीट अंमलदार पोहेकाॅ दिनेश गवळी पोहेकाॅ घुले व त्यांच्या अन्य सहकार्यानी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व पाण्यावर तरंगत असलेले प्रेत खड्ड्याच्या वर काढले जवळगा पोमादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मयताचे शवविच्छेदन करण्यात आले व त्यानंतर नागरसोगा येथील स्मशान भूमीत मयत राजकुमार अडसुळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले औसा पोलिसात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोहेकाॅ दिनेश गवळी हे करीत आहेत.

