

या अपघातात बसमधील १५ प्रवासींपैकी एक प्रवासी किरकोळ जखमी झाला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही असे बसचालकाने सांगितले . यामुळे अपघातात मोठा अनर्थ टळला आहे.
लातूर शहरातून जाणाऱ्या या एक्सप्रेस हायवेवरून कंटेनर व ट्रक भरधाव वेगाने धावत असल्याने गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः राजीव गांधी चौक परिसरात वाहतुकीचा वेग आणि अनियंत्रित ट्राफिकमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची सतत उपस्थिती असते परंतु वाहतूक व्यवस्थापन कमी आणि दंड वसुलीवर अधिक भर दिला जातो, सिग्नल व्यवस्था आहे परंतु ती कधीतरी चालू असते, स्पीड ब्रेकरची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.

