
अभय मिरजकर .
” केल्याने रे आधी केले पाहिजे ” असे म्हणतात . हे कृतीत उतरून उतरून हजारो वृक्ष लागवड करत चळवळ उभी कर्ता मॅनेज नांदेड लोकाधिकारी कंट्रिनिटिर् पाणभोशी येथील शिवसांब घोडके होय. त्यांच्या कार्याची उभारणी अनुकरण केले तरी त्यातले वृक्ष लागवड प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकते. एक निर्दोष ही संकल्पना सुरू करून चळवळीत आता अनेकजण जोडले गेले आहेत.

वनरक्षक म्हणून काम करणारे शिवसांब घोडके यांनी किनवट भागात काम केले नंतर कंधार तालुक्यात बदली झाली व तेथील झाडांचे अत्यल्प प्रमाण पाहून वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला. शासकीय वृक्ष लागवड म्हणजे दरवर्षी एकच खड्डा आणि तीथेच वृक्षारोपण व फोटो सेशन असे म्हणत वृक्षलागवड चळवळ बदनाम झाली आहे. त्यामुळे शिवसांब घोडके यांनी 27 ऑक्टोबर 2021 मध्ये स्वतः दररोज एक रोप वृक्ष लागवडीचा संकल्प केला व ही चळवळ सूरु केली ती स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने.
नवीन वर्षापासून आपण दररोज एक रोप लागवड चळवळ सुरू करायची असा निर्धार केला,गावातीलच सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावर डोंगराळ भागावर खडकाळ भागात ही रोप लागवड एक जानेवारी 2022 पासून सुरू झाली. एकट्याने ही चळवळ सुरुवात केली . काही महिने त्यांना कोणाचीही साथ मिळाली नाही परंतु सातत्याने दररोज एक रोप लागवड करून लागवड केलेले फोटो व्हिडिओ व्हाट्सअप च्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी पाठवायचो व व्हाट्सअप वर स्टेटस ठेवून लोकांमध्ये जनजागृती करायची. अनेक मित्रांचे व गावातील नागरिकांचे वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती वाढदिवसाच्या निमित्ताने एक रोप लागवड करण्यासाठी निमंत्रित करून त्यांना अगदी मोफत रोप पुरवठा करून खड्डा खोदून नागरिकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोप लागवड करायला सुरुवात केली आणि अनेक लोकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोप लागवड केल्यामुळे अनेक जण या दररोज एक रोप लागवड चळवळीत स्वयं प्रेरणेने निसर्गसेवा देण्यासाठी समोर आले. निसर्ग शिवा गट पानबोशी हा गट निर्माण केला पाहता पाहता अनेक गावांमध्ये या प्रकारचे निसर्गसेवा गट स्थापित झाले व अनेक जण निसर्गसेवा करण्यासाठी निसर्ग सेवक म्हणून सहभागी झाले

दिनांक 1 जानेवारी 2022 पासून सुरुवात झालेली ही चळवळ आज अखंडपणे सुरू आहे. यामध्ये विविध कारणांनी रोप लागवड करण्यात आली प्रामुख्याने वाढदिवस, लग्न वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी, नोकरी लागल्याच्या निमित्ताने, साक्षगंध निमित्ताने, लग्नामध्ये वृक्ष भेट, आहेर भेट, मुलगी जन्माला आल्यानंतर मुलीच्या स्वागतासाठी वृक्ष लागवड, सेवानिवृत्तीच्या निमित्ताने रोप लागवड, प्रिय व्यक्तींच्या स्मृतीत स्मृतीवन म्हणून वृक्ष लागवड, माहेरचे झाड म्हणून लागवड, आईच्या नावाने रोप लागवड, शाळेतील विद्यार्थी यांची सहल काढून विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्ष लागवड या व अनेक कारणांनी आजपर्यंत 23 हजार पेक्षा जास्त रोख लागवड लोकसहभागातून करून ती झाडे जगवलेले आहेत
लागवड करण्यात आलेल्या प्रत्येक रोपास ठिबकद्वारे पाणीपुरवठा करून त्यास पावसाचे पाणी नैसर्गिक रित्या उपलब्ध व्हावे यासाठी सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती माथा ते पायथा जल व मृतसुंदरणाचे उपचार करून सलग समपातळीत रोपांची लागवड करण्यात आली त्यामध्ये कमी पाण्यात जगणारी देशी दुर्मिळ औषधी वनस्पतींची, स्थानिक वृक्षांची निवड करण्यात आली. पहिल्या वर्षामध्ये लागवड करण्यात आलेल्या रोपांना पाणी देणे प्रचंड त्रासाचे ठरले कारण माळरानावरती खडकाळ व उजाड उतार असलेल्या माळावर पाणी उपलब्ध नव्हते त्या आणि या माळरानावरती गावातील व इतर प्राण्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वावर होता त्यामुळे या ठिकाणी लागवड केलेल्या सुरुवातीच्या काळातील रोपांना एक तर पाण्याची कमतरता आणि दुसरे म्हणजे जनावर यांच्या त्रासामुळे पहिल्या सहा महिन्यात लागवड केलेल्या अनेक रोपांना प्राण्यांनी नुकसान पोहोचवले व पाणी सुद्धा उन्हाळ्यात कमी पडायला लागले परंतु ही चळवळ सातत्याने अखंडपणे सुरू असल्यामुळे गावातील निसर्गप्रेमी व्यक्तींनी माळाच्या पोटाशी एक बोर करून त्याची एक इंची पाईपलाईन करून माळावरती आणून सोडल्यामुळे मोठी मदत झाली व उन्हाळ्यात सुद्धा काही वृक्षांना पाणीपुरवठा केला .त्यामुळे उन्हाळ्यात रोपांची मरण्याची संख्या नगण्य होती.

एक वडाचे रोप वाढदिवसाच्या निमित्ताने लागवड केली. तीथे केवळ एकच चिंचेचे झाड होते पहिले लागवड केलेले वटवृक्षाचे रोप आज सुमारे वीस ते पंचवीस फूट उंचीपर्यंत वाढलेले आहे. आज तिथे शेकडो झाडं हिरवीगार उभी आहेत.आजपर्यंत तीस हजारांहून अधिक झाडं लावली आहेत आणि ती जिवंत आहेत. हे फक्त लावणं नाही, तर त्यांचं रोज संगोपन करणं महत्वाचं आहे. सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोषी या माळावरती आजपर्यंत सहा हजार पेक्षा जास्त रोप लागवड करून जगवलेली आहेत त्यामध्ये 300 पेक्षा जास्त विविध प्रजातींचा सहभाग आहे. गावामध्ये व अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रोप लागवड करून जगवलेली आहेत .पोलीस स्थानक माळाकोळी या ठिकाणी सुद्धा 4500 रोप लागवड करून ती जगवलेल्या असून सध्या काही झाडे तीस फुटांपेक्षा अधिक उंच वाढली आहेत . लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरालगत असलेल्या डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या भक्ती स्थळावर सुद्धा रोप लागवड करून जगवणे सुरू आहे
वन व वन्यजीव संरक्षण व संवर्धन या कार्यामध्ये आतापर्यंत दोन वेळा सुवर्णपदक मिळालेल्या असून यामध्ये सन 2014 व 2018 -19 यामध्ये राज्यस्तरीय स्वर्ण पदक प्राप्त झालेले आहे. राष्ट्र निर्माता निर्माता संघ अमरावती यांच्याकडून राज्यस्तरीय राष्ट्रनिर्माता पुरस्कार मिळालेला आहे ग्रामपंचायत कार्यालय पाणबोशी यांच्याकडून माझ्या दररोज एक कार्याची दखल घेऊन मला पानबोशी या गावचा ट्री मॅन ऑफ पानभोसी*
हा मान देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे

