
लातूर शहरातील राजकीय वर्तुळात आज अक्षरशः धडकी भरवणारी घटना घडली. अमित विलासराव देशमुख यांच्या थेट आशीर्वादामुळे राजकीय ओळख, सत्ता आणि प्रतिष्ठा मिळवलेले माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी अचानक ‘घर’ बदलताना भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
उदगीर येथे अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांच्या उपस्थितीत कांबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लातूर शहरात एकच चर्चा—

👉 “जे काही मिळालं ते काँग्रेसमध्ये… मगच काय, अचानक भाजपमध्ये जाण्याची एवढी घाई कशाची?”
काँग्रेसमध्ये असताना मिळालेला मान, पद, राजकीय बळ — हे सर्व अमित देशमुख यांच्या थेट पाठिंब्यामुळे. त्यांच्या ‘पॉवर सेंटर’मध्ये राहूनच लक्ष्मण कांबळे यांनी नगराध्यक्ष पद भूषवले. परंतु एवढे मोठे राजकीय लाभ मिळूनही आता ते भाजपमध्ये का गेले?
लातूरमध्ये आज दिवसभर या प्रश्नाची उलटसुलट चर्चा, आरोप-प्रत्यारोप, आणि राजकीय कुजबुज सुरूच आहे.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर, तर भाजपमध्ये त्यांच्या आगमनामुळे नव्या समीकरणांची चर्चा तापली आहे.
लातूरची सध्याची चर्चा फक्त एकच—
“कांबळेंचा ‘राजकीय पलटी मारक’ निर्णय हा स्वार्थाचा खेळ की अजून कुणाच्या इशाऱ्यावर घडलेली मोठी चाल?”
राजकारणात धक्के बसणे नवीन नाही… पण आजचा धक्का लातूरने जोरात जाणवला!

