
लातूर दि.८(प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे बल्लाळनाथ चिंचोली येथील रहिवासी सिमा सुरक्षा दलातील सेवानिवृत्त निरीक्षक सुनील रमाकांतराव राजहंस यांना राष्ट्रपती पदक, सन्मानपञाने पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या हस्ते चंदीगढ येथे एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
मौजे चिंचोली बल्लाळनाथ येथील रहिवासी असलेले सुनील रमाकांतराव राजहंस हे नुकतेच सिमा सुरक्षा दलातील निरीक्षक पदावरून ४१ वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले. सन २०२३ च्या गणतंत्र दिनादिवशी उत्कृष्ट कार्य सेवेबद्दल पोलिस मेडल जाहिर करण्यात आले होते. परंतु कोरोना कारणांमुळे सन २०२१,२०२२ आणि २०२३ चे पदक वितरण समारंभ झालेला नव्हता.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु द्वारा स्वाक्षरीत प्रमाणपत्राने व पदकाने चंदीगड येथे निप्पर आयुर्वेदिक संस्थेमध्ये झालेल्या कार्यक्रमात पंजाबचे राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी सिमा सुरक्षा दलातील वरिष्ठ अधिकारी, सेना दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

