
मुंबई: अखिल भारतीय कामगार सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस मा.आ.सचिनभाऊ अहिरसाहेब यांची आज दिनांक 11/02 /2025.भेट घेतली असता महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली असुन पुढील आठवडय़ात पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे सर्व विभागीय अध्यक्ष सचिव जिल्हा अध्यक्ष सचिव व राज्य कार्यकारिणी पदाधिकारी यांच्यासह मी स्वतः उपस्थित राहुन प्रत्येक जिल्हा पदाधिकारी विभागीय पदाधिकारी यांचीशी पक्षप्रमुख चर्चा करुन राजव्यापी अधिवेशन किंवा मेळाव्यासाठी वेळ व तारीख घेवुन ग्रामपंचायत कर्मचारी यांचा राज्यव्यापी अधिवेशन घेण्याचे ठरले आहे तरी यावेळी राज्याध्यक्ष विलासभाऊ कुमारवार राज्य सरचिटणीस दयानंद एरंडे लातूर जिल्हा अध्यक्ष सतीश मस्के धाराशिव जिल्हा सहसचिव अरुण रसाळ लातूर शिवसेना शहर संघटक सुनील फुलारी यावेळी उपस्थित होते

