
किल्लारी : येथून जवळच असलेल्या नदी हत्तरगा येथिल विमलबाई बबन गायकवाड यांच्या राहत्या घरी भर दुपारी दि.२५/०२/२०२५ भर दुपारी दोनच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला.यामध्ये सुदैवाने कसलीही जीवीत हानी झाली नसून विमलबाई गायकवाड यांच्या घराचे मोट्ठे नुकसान झाले तर पत्र्याचे शेड अन्नधान्य व भांडी कोंडी व संसार उपयोगी सर्व काही या स्फोटात जाळून खाक झाले.
स्फोट इतका जोरात झाला की, गॅस टाकी स्फोटाने लांब उडून गेली त्यात संपूर्ण घर जळून खाक झाले.अदोगारच मोलमजुरी करून आपली उपजीविका भागविणाऱ्या विमलबाई वर मोट्ठे संकट ओढावले आता ती हतबल झाली असून त्याच्या संसारातील तब्बल तीन ते चार लाखा पेक्षा जास्तीचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी शेजारील जयशवर्धन सुरेश सूर्यवंशी यांच्या किरणा दुकांनातील माल या आगीमुळे जाळून भस्म झाला आहे. यावेळी गावातील सरपंच मोहन कुनाळे,उपसरपंच संतोष गरगटे, ग्रामसेवक हरिदास मोरे, तलाठी दयानंद हुमनाबादे, प्रदीप कांबळे, अविनाश कांबळे, हर्षवर्धन सूर्यवंशी, विकी कांबळे, विशाल कांबळे, सुरेश सूर्यवंशी आदींनी हि आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

तसेच तलाठी व ग्राम सेवक यांनी तात्काळ अग्निशामक दलाना माहिती देऊन अग्निशामक दल नदी हत्तरगा येथे येऊन आग विझवण्यात आली तरी शासनाने मौजे नदी हत्तरगा स्फोट झालेल्या विमलबाई गायकवाड यांच्या घराची पहाणी करून त्यांना शासकीय मदत देऊन त्यांचा संसार पुन्हा नव्याने उभा आकारून द्यावा अशी मागणी नदी हत्तरगा येथील जनतेतून केली जात आहे.

