
लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त “घरचा शिवजन्मोत्सव” या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १९ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या आठ दिवसांच्या कालावधीत हा उपक्रम नागरिकांसाठी खुला ठेवण्यात आला होता.

दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी मा. जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाची सांगता झाली. यावेळी मा. उपविभागीय अधिकारी श्रीमती रोहिणी नरे-विरोळे, मा. तहसीलदार श्री सौदागर तांदळे, इतिहासकार व साहित्यिक श्री विवेकजी सौताडेकर, प्राचार्य निलेशजी राजेमाने, प्रा. संभाजी नवघरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमास मा. सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील, आमदार श्री विक्रम काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमयजी मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक समशेर बहाद्दर कोयाजी राव बांदल यांचे तेरावे वंशज श्री अक्षय राव बांदल, तुकाराम भैय्या पाटील मित्र मंडळातील सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन आपला सहभाग नोंदवला.

उपक्रमाचे वैशिष्ट्ये:
- घरच्या घरी शिवजन्म सोहळ्याचे भव्य दर्शन
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित माहितीपर प्रदर्शन
- नागरिकांसाठी प्रेरणादायी आणि ऐतिहासिक माहितीचा खजिना

उपस्थित सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. लातूरच्या इतिहासप्रेमी नागरिकांनीही मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला. शिवप्रेम आणि इतिहास जपणाऱ्या या उपक्रमाने समाजात नवा संदेश दिला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

