• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

डॉ. अशोक पोद्दार यांची महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असो.च्या .विभागीय उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडलातूर ऑर्थोपेडिक असोसिएशन बेस्ट चॅप्टर अवॉर्डने सन्मानित

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
February 28, 2025
in Blog
0
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर : लातूर येथील ज्येष्ठ अस्थिशल्य चिकित्सक तथा पोद्दार ऍक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटरचे संचालक डॉ. अशोक पोद्दार यांची महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या विभागीय उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र ऑर्थो. असो.च्या वार्षिक संमेलनात लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशनला बेस्ट चॅप्टर अवॉर्ड तसेच बेस्ट महाराष्ट्र ऑर्थोपेडिक दिवस अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.


महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे वार्षिक संमेलन नाशिकमध्ये पार पडले. या संमेलनात लातूर ऑर्थोपेडिक असो.चे अध्यक्ष डॉ.अशोक पोद्दार यांची विभागीय उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ. अशोक पोद्दार व डॉ. संतोष माळी यांचे ऑर्थोपेडिक ,सामाजिक, वैद्यकीय शिक्षण विषयक उपक्रम, सीएमई , १२ ऑर्थोपेडिक सीएमई, ५ समाजोपयोगी उपक्रम त्याचप्रमाणे ऑर्थोपेडिक तज्ज्ञांना एकत्रित करून आऊट डोअर सीएमई च्या आयोजनातही मौलिक योगदान राहिले आहे. डॉ. अशोक पोद्दार व डॉ.संतोष माळी यांनी आपल्या कार्यकाळात लातूर ऑर्थोपेडिक संघटनेला १० एमएमसी पॉईंट मिळवून दिले आहेत. लातूर ऑर्थोपेडिक असो.च्या वतीने त्यांनी मॉर्निंग वॉकर्स संघटनेसाठी हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, बीपी, शुगर तपासणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी लेक्चर्स, वैद्यकीय कायदेविषयक लेक्चर्सच्या आयोजनातही पुढाकार घेण्याचे काम केले आहे. वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरासाठीही ते कायम आग्रही असतात.

लातूरचे ज्येष्ठ ऑर्थोपेडिक तज्ज्ञ दिवंगत डॉ. जगदीश अग्रोया, डॉ. रामेश्वर कांदे यांच्या स्मरणार्थ एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ऑर्थोपेडिक विषयात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याची घोषणाही डॉ. अशोक पोद्दार व डॉ. संतोष माळी यांनी केली आहे. डॉ. अशोक पोद्दार व सचिव डॉ. संतोष माळी यांच्या कुशल नेतृत्वाखाली लातूर ऑर्थोपेडिक असो.ने केलेली नेत्रदीपक कामगिरी पाहूनच महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असो. लातूरला बेस्ट चॅप्टर अवॉर्ड तसेच बेस्ट महाराष्ट्र ऑर्थोपेडिक दिवस अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. जिल्हाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार व सचिव डॉ. संतोष माळी यांनी इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नवीन ठक्कर, महाराष्ट्र ऑर्थो. असो.चे अध्यक्ष डॉ. कोठाडिया, सचिव डॉ. अभिजित वायगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑर्थोपेडिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. अग्रवाल, सचिव डॉ. प्रशांत भुतडा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांच्या सहकार्याने लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशनने हा पुरस्कार पटकावल्याचे सांगितले. ऑर्थोपेडिक क्षेत्रांतील वरिष्ठांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, शुभेच्छा यामुळे आम्हाला सर्वांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळाली आणि त्यातून संघटना सर्वोत्कृष्ट कार्य करू शकली. या पुरस्काराबद्दल या क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ मान्यवरांचे आपण आभार व्यक्त करतो, असेही डॉ. पोद्दार यांनी सांगितले.

Previous Post

विभागीय महसुल आयुक्तालयाच्या मागणीसाठी, कृती समिती आणि लोकप्रतिनिधी यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक – मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

Next Post

“श्री गुरुकुल स्काॅलर्स” प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न.

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

"श्री गुरुकुल स्काॅलर्स" प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

कृषी सेवारत्न पुरस्काराबद्दल सूर्यकांत लोखंडे यांचा सत्कार

September 21, 2026

Recent News

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

कृषी सेवारत्न पुरस्काराबद्दल सूर्यकांत लोखंडे यांचा सत्कार

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved