
लातुर गेली कांही दिवसापासुन मराठवाड्यातील दुसरे महसुल विभागीय आयुक्तालय स्थापनेच्या दृष्टीकोणातुन नांदेड येथील वक्तव्यामुळे निर्माण झालेला संभ्रम दुर व्हावा तसेच गेली अनेक वर्षापासुन लातुरकर गुणवत्तेच्या आधारावर आणि मराठवाड्याचा सर्वांगीण विकासासाठी लातुर येथे मराठवाड्यातील दुसरे स्वतंत्र विभागीय महसुल कार्यालय स्थापन व्हावे यासाठी सनदशीर मार्गाने मागणी करत आहेत, उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या दांगट समितीचा अहवाल लातुरसाठी सकारात्मक असुन आज लातुर येथे प्रामुख्याने शिक्षण, कृषि, पणन, आरोग्य, सहकार, औद्योगीक विकास व लघु उद्योग, कामगार, धर्मादाय अशा विविध खात्याची तब्बल ३६ विभागीय कार्यालय गेली अनेक वर्षापासुन कार्यरत आहे. त्याच बरोबर प्रशस्त ईमारत शासनाने उभी केली आहे. म्हणून लातूर येथेच महसुल आयुक्तालय स्थापन करण्यात यावे. या मागणीचे निवेदन लातुर महसुल आयुक्तालय कृती समितीने लातुर जिल्ह्याचे पालक मंत्री मा.ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देण्यात आले.
यावेळी पालकमंत्री महोदयांनी लातुरकरांच्या रास्त मागणीसाठी कृति समितीचे सदस्य, जिल्ह्यातील आमदार व खासदार यांच्या शिष्टमंडळाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच बैठकीचे
आयोजन केले जाईल, लातूरकरांच्या न्याय मागणीचा मी स्वतः पाठपुरावा करेन असे आश्वासित केले.
मा. पालकमंत्री यांची जिल्ह्याधिकारी कार्यालय लातुर येथे शिष्टमंडळांनी घेतलेल्या बैठकीत प्रामुख्याने अॅड. व्यंकट बेद्रे, अॅड. उदय गवारे, देविदास काळे, अॅड. अण्णाराव पाटील, रवि सुडे, धनराज साठे, दिलीपराव देशमुख, शैलेश लाहोटी, अॅड. प्रदीप गंगणे, अॅड. वसंत उगले, अॅड. विजय जाधव, अॅड. संतोष गिल्डा, अॅड. भालचंद्र कवठेकर, अॅड. सुनिल गायकवाड, अॅड. विजय अवचारे आदी उपस्थित होते.

