
लातूर येथील सिग्नल कॅम्प भागातील “श्री गुरुकुल स्कॉलर्स” प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलचे २०२४-२५ चे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात व थाटामाटात साजरे करण्यात आले.
“श्री गुरुकुल स्कॉलर्स” प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल ची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असुन या स्कूल ने यावर्षी ९ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. या स्कूल तर्फे वर्षभरात वेगवेगळे सार्वजनिक उपक्रम राबविण्यात येतात. त्यात विशेष म्हणजे शाळेतील मुलांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षाचे रोप भेटवस्तू म्हणून दिले जाते, तसेच त्या रोपाचे संगोपन व त्याबद्दल चे महत्व ही मुलांना व त्याच्या कुटुंबाला सांगण्यात येते.
यावर्षी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध उद्योजक व वकील ॲड.सुरेश बामणकर, सुप्रसिद्ध वकील ॲड.राजू पाटील, शिवसेना युवा नेते ॲड.राहुल मातोळकर व उद्योजक सौ.स्मिता खटोड यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड.किरण बडे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागतही झाडांची रोपटे देऊन करण्यात आले. यावेळी २०२४-२५ मधील “बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर” हे पुरस्कारही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले. सदरील पुरस्कार काव्यलक्ष्मी केंद्रे, रचित गेल्डा, शिवांश चामे व आरुष पटवारी या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी स्कूल मधील या लहान चिमुकल्यांनी आपल्या सुंदर नृत्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. प्रिया किरण बडे यांनी केले, सूत्रसंचालन श्री. शिवपुत्र स्वामी सर यांनी केले, मुलांचे नृत्याविष्कार श्री.रमेश भिसे सर यांनी अतिशय सुंदर रित्या घडवून आणले, तर आभार प्रदर्शन श्रीजनी मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला स्कूलचे शिक्षक वर्ग, कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

