
अहमदपूर, दि.३ – तालुक्यातील मरशिवणी जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील श्री साई पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने येणार्या कारने दुचाकीला दि.२ मार्च रोजी सायंकाळी ०५:३० वाजता जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील इसमाचा जागीच मृत्यू झाला.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, पालम तालुक्यातील बनवस येथील ज्ञानोबा मधुकर सुरनर (वय ४२ वर्ष) हा इसम अहमदपूर तालुक्यातील मरशिवणी जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील श्री साई पेट्रोल पंपा समोरील धाब्यावर जेवण करून अहमदपूरकडे काही कामानिमित्त आपली दुचाकी क्र.एम.एच २२ डब्ल्यू १२०१ घेऊन निघाला असता नांदेड कडून अहमदपूरकडे हुंडाई कंपनीची एक्सटर गाडी क्रमांक एम.एच.२२ बि.सि. १७०२ ही भरधाव वेगाने येत होती. या कारने दुचाकीस जोराची धडक दिल्याने दुचाकी पन्नास फुट लांब उडून रस्त्याच्या बाजूस जाऊन पडली. यात दुचाकीवरील ज्ञानोबा सुरनर याचा जागीच मृत्यू झाला.

