दोषींना २ ते १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
वीजबील वसुलीसाठी मोहीम तीव्र
लातूर, प्रतिनिधी: परिमंडळात वीजबिल वसुली मोहिम तीव्र करण्यात आली आहे. दरम्यान महावितरणच्या कर्मचाांना होणारी धक्काबुक्की, शिवीगाळ अश्या निंदणीय घटना परिमंडळात घडू नयेत यासाठी महावितरण आक्रमक झाले आहे.
महावितरणच्या परिमंडळ प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून संबंधित व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाईसाठी प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात येणार आहे. विजेचे बिल वेळेत भरणे हे ग्राहकाचे कर्तव्य आहे. जर एखादा ग्राहक वीजबिल भरण्याला प्रतिसाद देत नसेल तर त्याा ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. त्याामुळे ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
मार्च अखेर निर्धारीत केलेले वीजबील वसुलीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी १० दिवस बाकी आहेत, परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू महिन्याचे ११२ कोटी ७० लाख रूपये तसेच पथदिवे व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे ११ कोटी ७९ असे एकत्रीत १२४ कोटी ४९ लाख रूपये वसुलीचे उदिष्ट आहे. मात्र अद्याप ३५ कोटी ५० लाख वसूल होणे बाकी आहे. ग्राहक वीजबिल भरत नसल्याने महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत कर्मचारी थकबाकीदारांच्या दारात पोहचत आहेत. बिल भरले नाही तर वीज नाही असा नाईलाजास्तव पवित्रा घेत महावितरणकडून थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. तथापि वीजबिल थकविणाऱ्या ग्राहकांकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाणीच्या काही अनुचित घटना घडत आहेत.
शासकीय कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे किंवा कार्यालयांची तोडफोड करणे आदी प्रकरणांमध्ये दोषी व्यक्तीकरीता भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये २ ते १० वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणांमध्ये व्यवस्थापन संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून संबंधितावर नक्की कायदेशीर कारवाई होणार याची जाणीव ठेवत वीज ग्राहकांनी नियमानुसार आणि वेळेत थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
बॉक्स
सुट्टीच्या दिवसातही वीजग्राहकांना वीजबील भरण्यास अडचण येवू नये याकरिता महावितरणचे सर्वा वीजबील भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे वीजग्राहकांनी वेळ न दवडता देय तारखेच्या आत वीजबीलाचा भरणा करावा. त्याचबरोबर ऑनलाईनच्या माध्यामातूनही घरबसल्या वीजबील भरण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिलेली आहे.

